Satyacha Morcha Mumbai: फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय...मनसे अन् महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; गर्दी किती?, पाहा Photo's
Satyacha Morcha Mumbai: Satyacha Morcha Mumbai: मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज एल्गार पुकारला.
Continues below advertisement
Satyacha Morcha Mumbai
Continues below advertisement
1/8
Satyacha Morcha Mumbai: मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज एल्गार पुकारला.
2/8
महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा (Satyacha Morcha Mumbai) काढण्यात येणार आहे..
3/8
सत्याचा मोर्चा असं या मोर्चाचं नामकरण देण्यात आलंय. या मोर्चाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), आदित्य ठाकरे, अमित ठाकरे पोहोचले आहेत.
4/8
सकाळपासून चर्चगेट परिसरात मनसे आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.
5/8
मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथे स्टेज उभारण्यात आला आहे या ठिकाणी प्रत्येक पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची भाषण होतील.
Continues below advertisement
6/8
फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत सत्याचा मोर्चा असणार आहे. त्यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयाच्या बाजूला उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह महाविकास आघाडीतील नेत्यांची भाषणं होतील.
7/8
निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत हा मोर्चा काढण्यात आला. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर यावं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.
8/8
मतदारयाद्या अद्ययावत करा, मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा, मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा आणि सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा, अशा प्रमुख मागण्या विरोधकांकडून करण्यात आल्या आहेत.
Published at : 01 Nov 2025 01:58 PM (IST)