मुंबई: तब्बल 20 वर्षांनंतर मराठी अस्मितेसाठी राज आणि उध्दव ठाकरे हे एकत्र आले. आज ठाकरे बंधूंनी वरळी डोममध्ये विजय मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरती परखडपणे भाष्य केलं आहे. यावेळी मनसेने हिंदीला विरोध केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आणि मुलांच्या शिक्षणावरती बोट ठेवलं, त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "आमची मुले इंग्रजीत शिकली माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे इंग्रजीत शिकले त्यांचा मराठीवर शंका घेणार का? लालकृष्ण अडवाणी मिशनरी शाळेत शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न घेणार का? उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठी भाषेचा कडवट अभिमान बाळगेल तुम्हाला काय प्रॉब्लम आहे?", असं राज ठाकरे म्हणाले.
दक्षिण भारतामध्ये बघा तमिळच्या प्रश्नावरती, तेलगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात. त्यांना कोणी विचारत नाही तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात. उद्या मी हिब्रू भाषा शिकून आणि मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगेल तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे. मी आत्ता तुमच्याकडे दक्षिणेतील इंग्रजीमध्ये शिकलेले अगदी थोडक्यात यादी आणली आहे, भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते आहेत ते सांगतो असं म्हणत राज ठाकरेंनी दक्षिणेतील नेते आणि अभिनेते यांची नावे सांगितले.
राज ठाकरेंनी वाचली यादी
जय ललिता, स्टॅलिन, उदय निधी म्हणजे करुणानिधींचे नातू, चंद्राबाबू नायडू, पवन कल्याण, आंध्र उपमुख्यमंत्री, नारा लोकेश, चंद्राबाबूचा मुलगा, कमल हसन, अभिनेता सूर्या, ए आर रहमान, हे सर्वजण इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेले आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्या इंग्रजी शाळांची नावं देखील वाचली.
परवाचा एक किस्सा सांगतो, एआररहमान एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती उपस्थित होते. त्या बोलणाऱ्या बाई तमिळमध्ये बोलत होत्या, अचानक त्या बाई हिंदीत बोलायला लागल्या त्याच्यावरती ए आर रहमान यांनी त्या बाईकडे बघितलं आणि विचारले हिंदी आणि ते व्यासपीठावरून खाली उतरले. तुमच्या कडवटपणा हा तुमचा शिक्षण कुठे झालं याच्यावरती नसतो तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो. माननीय बाळासाहेब इंग्रजी मिडीयम मध्ये शिकले इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्र काढायचे, पण मराठीचा अभिमान याच्याबाबतीत कधी त्यांनी तडजोड केली नाही असेही पुढे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे
राज ठाकरेंनी सांगितला एआर रेहमान यांचा तो किस्सा
ए आर रेहमान एका कार्यक्रमासाठी स्टेजवर होते. तिथ एक महिला तमिळ भाषेत बोलत होती. त्यानंतर ती महिला हिंदीत बोलू लागली. रहमानने त्या महिलेकडे पाहिलं अन् स्टेज सोडला. एक भाषा सगळ्यांना बांधून ठेवते? कोणती भाषा? संरक्षण दलात विविध रेजिमेंट आहे. एखादी घटना घडली की सगळे तुटून पडतात ना. आज सगळे तुम्ही मराठी म्हणून एकत्र आला आहेत. आता याच पुढच राजकारण तुम्हाला जातीच राजकारण सुरू करतील. आता सुरू केलं आहे, यांनी मीरा भाईंदरला व्यापाराच्या कानफाडात मारली. व्यापाऱ्याला मारला म्हणतात अजून तर काहीच केलेलं नाही. विनाकारण मारामारी करत नाहीत. मात्र जास्त उठबस केली तर कानाखाली आवाज काढला जाईल असंही पुढे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.