Raj Thackeray and MNS Workers : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. राज्यात सुरु असलेल्या अत्याचाराच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विदर्भातील एका वसतीगृहात जात शाळेतील मुलींची विचारपूस केली. दरम्यान आता चंद्रपूरमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी थेट चंद्रपूर आणि राजुरा विधानसभेसाठी उमेदवार घोषित केले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 6 उमेदवार ठाकरेंकडून घोषित करण्यात आले. चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी उमेदवार घोषित करताच चंद्रपूरमध्ये मनसैनिक भिडले आहेत. दोन गटात हाणामारी झाली आहे. सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. 


चंद्रप्रकाश बोरकर यांचा सचिन भोयर यांच्या  उमेदवारीला तीव्र विरोध 


राज ठाकरेंकडून आज चंद्रपूर जिल्ह्याच्या बैठकीत राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर नावाच्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र त्यास जिल्हा सचिव चंद्रप्रकाश बोरकर यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा उमेदवारीला तीव्र विरोध होता. त्या मुद्द्यावरूनच दोन गटांमध्ये आधी शाब्दिक वादावादी झाली आणि नंतर धक्काबुक्की झाली त्यानंतर हे प्रकरण एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत गेलं. 


सोलापूरपासून राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केली


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसलीये. विधानसभेसाठी त्यांनी महाराष्ट्रा दौरा सुरु केलाय. सोलापूरपासून राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केली. त्यानंतर ते धाराशिव आणि मराठवाड्याचा दौरा करत राहिले. छत्रपती संभाजीनगरचा दौरा सुरु असताना त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या देखील फेकण्यात आल्या होत्या. त्यामुळे मनसैनिक आणि शिवसैनिकांध्ये मोठा राडाही झाला. राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकण्यात आल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले. त्यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकत हल्ला केला. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते. 







इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar : आधी मगरपट्ट्यात ऊसाची शेती होती, नागरिकरण वाढत होते, शरद पवारांनी पुण्यातील जमिनीचा इतिहास सांगितला