Rahul Shewale on Rohit Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी गुरुवारी (दि.29) अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्यावर हल्लाबोल केला होता. दरम्यान, आज रोहित पवारांच्या टीकेला राहुल शेवाळेंनी शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. तो 'बालवाडीचा अध्यक्ष, त्याला काय उत्तर देणार, अशी टाका राहुल शेवाळे यांनी केली आहे.


अजित पवार यांची भेट घेणार 


राहुल शेवाळे (Rahul Shewale) म्हणाले,  कालच माझी उमेदवारी घोषित झाली. या निमित्ताने आज मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आलो. महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. 2014 त्यानंतर 2019 साली मला सहकार्य केलं. आता मी अजित पवार यांना सुद्धा भेटायला जाणार आहे, असं राहुल शेवाळे यांनी सांगितले. 


प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीने अपमान केला


पुढे बोलताना राहुल शेवाळे (Rahul Shewale) म्हणाले, यापूर्वीच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी आपल्याला दिसली आहे. खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे बिघाडी दिसत आहे. यात फायदा तोटा नाही. यात मान अपमान आहे. प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीने वारंवार अपमान केला. बैठकीला न बोलावून वेळोवेळी अपमान केला. 


निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून मतदार बदला घेतील


जसा काँग्रेसने त्याकाळी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला होता. तीच परंपरा आज पुढे चालवत प्रकाश आंबेडकरांचा देखील अपमान केला. येणाऱ्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून मतदार बदला घेतील, असंही राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी या लोकसभा मतदारसंघात अनिल देसाई यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे मुंबईतील एका जागेवर दोन्ही शिवसेना आमने-सामने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल शेवाळे अनिल देसाईंच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar Collar Video : उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा स्वॅग, थाटात उडवली कॉलर, साताऱ्यात निवडणुकीची कुस्ती रंगणार!