Rahul Gandhi On Marriage : काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं अद्याप लग्न (Marriage) झालेलं नाही. त्यामुळे राहुल गांधी लग्न कधी करणार असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. दरम्यान, राहुल गांधी यांनी लग्नाबाबत मौन सोडलं असून त्यांना लग्नासाठी कशी मुलगी हवी किंवा कशाप्रकारच्या मुलीशी लग्न करायचे आहे, हे सांगितलं. "मला अशा जोडीदारासोबत राहायला आवडेल जिच्यामध्ये आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि आजी इंदिरा गांधी (Indira Gandhi) या दोघींचेही गुण असतील," असं राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) त्यांनी आपल्या लग्नाबाबतच्या प्रश्नावर दिलखुलास उत्तर दिलं.
'अशी मुलगी आवडेल'
आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्यासारखे गुण असलेल्या मुलीशी लग्न करायला आवडेल, असं काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लग्नाबाबतची त्यांची आवड सांगितली. राहुल गांधी यांना त्यांच्या आजीसोबतच्या नात्याबद्दल विचारले असता ते म्हणाले , "ती माझ्या आयुष्यातील प्रेम होती. ती माझी दुसरी आई होती. इंदिरा गांधींसारखे गुण असलेल्या मुलीशी लग्न करायला आवडेल का, असं विचारलं असता ते म्हणाले की, हा छान प्रश्न आहे. मला अशी मुलगी आवडेल जिच्यामध्ये माझ्या आजी आणि आईचे गुण असतील.
राहुल गांधी यांच्याकडे कार नाही
या मुलाखतीत राहुल गांधी यांनी कार आणि बाईकबद्दल सविस्तर भाष्य केलं. माझ्याकडे स्वतःची कोणतीही कार , परंतु त्यांच्या आईकडे एक कार आहे, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, मी लंडनमध्ये राहत असताना मी आरडी 350 बाईक चालवायचो, ती बाईक माझ्या आयुष्यातील प्रेम आहे. सोबतच मला सायकल चालवायला आवडते आणि एकदा लॅम्ब्रेटा (स्कूटर) आवडली होती, असं त्यांनी म्हटलं. आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने इलेक्ट्रिक वाहने आणि ड्रोनमध्ये भारत अजूनही मागे आहे, असंही राहुल गांधी यांनी नमूद केलं.
'पप्पू' म्हणून संबोधणं हा अपप्रचाराचा भाग : राहुल गांधी
कोणी मला 'पप्पू' म्हणून संबोधले तर वाईट वाटत नाही, कारण हा सर्व अपप्रचाराचा भाग आहे. असं बोलणारे स्वत:च त्रस्त आणि घाबरलेले आहेत, असंही उत्तर राहुल गांधी यांनी दिलं. हा अपप्रचाराचा भाग आहे. जो बोलत आहेत त्यांना भीती आहे, त्याच्या आयुष्यात काहीच चांगलं नाही, त्यांचे नातेसंबंध चांगले नाहीत. जर मला शिवी देऊन त्यांना बरं वाटत असेल तर द्यावी, मी त्याचं स्वागत करेन. मी कोणाचाही द्वेष करत नाही. तुम्ही मला शिव्या देता... मी तुमचा तिरस्कार करणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
संबंधित बातमी