Prashant Jagtap news: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचे जवळपास निश्चित केले आहे. तर शरद पवार गटाने ठाकरे गटालाही सोबत घेण्याचा प्रस्ताव अजित पवारांसमोर मांडला आहे. मात्र, यामुळे शरद पवार गटात नाराजी उफाळून आली होती. शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मी पक्षातून राजीनामा देईन, असा इशारा दिला होता. मात्र, प्रशांत जगताप यांच्या या इशाऱ्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा फरक पडलेला दिसत नाही. 

Continues below advertisement

कारण प्रशांत जगताप यांच्या इशाऱ्यानंतर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांची एक गुप्त बैठक सुरु आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे, विशाल तांबे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे उपस्थित आहेत. दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांना माहिती पाठवली जाणार आहे. आजच्या बैठकीत पुणे महानगरपालिका निवडणूक आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Pune Mahangarpalika Election: आता अजित पवारांसोबत गेलो तर लोकांसमोर कोणत्या तोंडाने मते मागायची, प्रशांत जगतापांचा सवाल

Continues below advertisement

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचे ठरवले आहे. मात्र, मी अद्याप पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. मी सुप्रिया सुळेंना मुंबईत भेटणार आहे आणि त्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करेन. अजित पवारांसोबत माझा वैयक्तिक वाद नाही. मात्र, अजित पवार एकीकडे महायुती सरकारमधे सहभागी असताना दुसरीकडे त्यांच्यासोबत आघाडी कशी करायची ? पुणेकरांना सक्षम विरोधीपक्ष हवा आहे. काँग्रेस अजित पवारांसोबत युती करायला तयार आहे, याबद्दल मला माहिती नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांनी याबद्दल निर्णय घ्यावा. कारण आपण कोणत्या तोंडाने लोकांना मते मागायची. महायुती सरकारने पुण्याचे वाटोळे केलेले आहे आणि अजित पवार त्या सरकारचा भाग आहेत. मी हेकेखोर नाही तर विचारधारा मानणारा आणि लढणारा कार्यकर्ता आहे, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले.

Pune news: पुण्यात पक्षांतराला सुरुवात

पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाला धक्का. पैलवान आणि माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे आणि त्यांची मुलगी दीप्ती कांबळे यांचा अजित पवार पक्षात प्रवेश. अंबरनाथ कांबळे हे आधी भाजपमध्ये होते त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला होता. आता त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि माजी नगरसेवक संजय भोसले हेदेखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

आणखी वाचा

अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; युतीची तारीखही ठरली! सुभाष जगताप नेमकं काय म्हणाले?