Prashant Koratkar, Nagpur : काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर यांनी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करत धमकी दिली होती. धमकीच नाही तर प्रशांत कोरटकर इंद्रजीत सावंत यांच्याशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द देखील वापरले होते. त्यानंतर राज्यभरातून कोरटकरवर टीकेची झोड उठली होती. याशिवाय त्यांच्यावर नागपूर आणि कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाला होती. अखेर आज (दि.2) व्हिडीओ शूट करत याबाबत स्पष्टीकरण दिलंय. शिवाय त्याने एक परिपत्रक देखील काढलंय.
प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर
दरम्यान, शनिवारी (दि.2) प्रशांत कोरटकरला कोल्हापुरातील न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. त्यामुळे कोरटकरवरची अटकेची टांगती तलवार दूर झाली. मात्र, तरिही राज्यभरातून त्यांच्यावर संताप व्यक्त करण्यात येत होता.
प्रशांत कोरटकरने काढलेल्या परिपत्रकात काय काय म्हटलंय ?
प्रशांत कोरटकर म्हणाला, छत्रपती शिवाजी महाराज माझे प्रेरणास्त्रोत आहेत. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी सदैव वंदनीय, आदरणीय असेच आहेत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हेही माझे प्रेरणास्त्रोत आहेत. शिवाजी महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि त्यासाठी मी नम्रतेने त्यांना नमस्कार व वंदन करत असतो.... शिवाजी महाराज एक आध्यात्मिक राजेच होते आणि ते ह्या महाराष्ट्राला लाभले हे आपले परम भाग्य... या भवानी मातेच्या पुत्राने असामान्य धैर्य आणि तलवार गाजवून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्याला त्रिवार वंदन... परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम। धर्मसंस्थापनार्था य संभवामी युगे युगे ।। त्यासाठी निसर्ग आपली अलौकिक माणस निर्माण करतो, त्यातला एक परमोत्कर्ष बिंदू म्हणजे आपले शिवाजी महाराज होते.... पुत्र कसा असावा हे आपण छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकतो हे माझे त्यांच्या बद्दल चे स्वाभाविक विचार...... छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडावर जाण्याचा मला अनेकदा योग आला आणि त्या निमित्ताने मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन केले आहे...... आजच्या प्रसंगी मी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ मा साहेबांना मानाचा मुजरा करतो.
जय जिजाऊ....
जय शिवराय ...
जय महाराष्ट्र
इतर महत्त्वाच्या बातम्या