Prashant Kishor Attack Congress: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसबाबत मोठे वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवावर बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, 2011-2021 पर्यंत मी 11 निवडणुकांशी निगडीत होतो आणि फक्त एक निवडणूक हरलो, जी यूपीमध्ये काँग्रेससोबत आहे. तेव्हापासून मी ठरवले आहे की, मी त्यांच्यासोबत (काँग्रेस) काम करणार नाही. कारण त्यांनी माझा ट्रॅक रेकॉर्ड खराब केला आहे.
प्रशांत किशोर हे सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. जिथे ते एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी विविध पक्षांसोबत निवडणूक रणनीतीकार म्हणून केलेल्या कामाची माहिती उपस्थितांना सांगितली. दहा वर्षांपासून हे काम करत असल्याचे प्रशांत किशोर यांनी लोकांशी संवाद साधताना सांगितले. या दहा वर्षांत त्यांनी वेगवेगळ्या पक्षांसोबत अकरा निवडणुका लढवल्या. ज्यामध्ये त्यांनी सर्व निवडणुका जिंकल्या. पण 2017 मध्ये त्यांनी यूपी निवडणुकीत काँग्रेससोबत काम केले. ज्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता त्यांनी काँग्रेससोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, काँग्रेसची सध्याची अवस्था आहे की, ते स्वतः तर हरणार आम्हालाही घेऊन बुडणार. ते म्हणाले की, 2011-21 या काळात गेल्या अकरा वर्षांत अकरा निवडणुकांशी त्यांचा संबंध होता. यादरम्यान ते फक्त एकच निवडणूक हरले, तीही यूपीमध्ये काँग्रेससोबत, त्यामुळे आता त्यांनी ठरवलं आहे की, भविष्यात काँग्रेससोबत काम करणार नाही. कारण काँग्रेस माझा ट्रॅक रेकॉर्ड खराब करेल.