Praniti Shinde on Corona Vaccine : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि दावे-प्रतिदावे पाहायला मिळत आहे. 'मोदींच्या पक्षाला 100 कोटी दिले, त्यामुळेच सीरम इन्स्टिट्युटला (Serum Institute on India) कोरोना लसीचं (Corona Vaccine) कंत्राट मिळालं', असा गंभीर आरोप आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी केला आहे. कोव्हिड लसीमुळे (Covid Vaccine) अनेकांना शुगर, BP चा त्रास, त्यामुळेच मी लस घेतली नाही, असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. 


'कोव्हिड लसीमुळे अनेकांना शुगर, BP चा त्रास'


लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावभेटी करत असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांनी अजब दावा केला आहे. कोविड वॅक्सिनमुळे ज्यांना काही दुखणे नव्हते, अशांना देखील बीपी, शुगर हृदयविकार झाले.   शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांना आमदार प्रणिती शिंदेनी भेट देत लोकांशी संवाद साधला. 


आमदार प्रणिती शिंदे यांचा अजब दावा


आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्यादरम्यान केलेल्या अजब दाव्यांनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. "सरकारने वॅक्सिन खरेदी केले होते त्यामुळे लोकाना जबरदस्ती केली", असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांना आमदार प्रणिती शिंदे यांनी भेट देत लोकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याचं दरम्यान इलेकट्रोल बॉण्डच्या मुद्यावरून मोदीवर टीका करताना आमदार प्रणिती शिंदेंनी कोरोना वॅक्सिन संदर्भात अजब दावा केला आहे.


'सीरम कंपनीची कोरोना वॅक्सिन जबरदस्तीने दिली'


"सर्वोच्च न्यायालयाने काल स्टेट बँकेवरती ताशेरे ओढले, इलेक्टरोल बॉण्डचा खुलासा करायला सांगितलं. यामध्ये ज्या कंपन्यांना मोदींनी टेंडर दिले, त्या कंपन्यांनी मोदींना म्हणजे भाजपाला पैसे दिल्याचे समोर आलं. आपल्याला ज्या सीरम कंपनीची कोरोना वॅक्सिन जबरदस्तीने दिली."


'सीरमने मोदींच्या पक्षाला 100 कोटी दिले'


प्रणिती शिंदे यांनी पुढे म्हटलं आहे की, "सीरम कंपनीने देखील 100 कोटी रुपये दिले आहेत, आपल्याला मारण्यासाठी. टेन्शन नका घेऊ पण आपल्याला वॅक्सीन जबरदस्ती का केलं, कारण सरकारने वॅक्सीन विकत घेतलं. तुमच्या आयुष्यावर पैसे कमवण्यासाठी सरकारने वॅक्सिन विकत घेतलं. तुम्हाला त्या वॅक्सिनसाठी जबरदस्ती केली आणि त्यामुळे आज कोणाला काही ना काही दुखणं सुरू झालं आहे.


वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो


"ज्यांना काहीच नव्हतं अशांना देखील काही ना काही बीपी, शुगर, हृदयविकार चालू झाले, मी तर वॅक्सिन घेतलीचं नाही. मी खरेच वॅक्सिन घेतलं नाही, मोदींचे फोटो असताना मी कशासाठी घेऊ? आपला एकमेव देश आहे जिथे वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो होते."


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Lok Sabha Election 2024 Date : महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक, तुमच्या भागात मतदान कधी होणार? जाणून घ्या सोप्या भाषेत