बीड :  येत्या विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhan Sabha Election)  ओबीसी आरक्षण (OBC Reservation)  धोक्यात येणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar)  केला आहे. दरम्यान मविआच्या (Maha Vikas Aghadi)  नेत्यांनी आरक्षणासंदर्भातील भूमिका मांडलीय त्यावरही प्रकाश आंबेडकरांनी संशय व्यक्त केला आहे. 55 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि सगे सोयरेच्या अंमलबजावणीला विरोध असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय. ते बीडमध्ये बोलत होते.    


प्रकाश आंबेडकर म्हणाले,  शरद पवारांसारख्या व्यक्तिमत्त्वाने विधानसभेत आम्ही  225 आम्ही आमदार आणणार असे म्हटले आहे.  लोकसभेचे त्यांचं आणि महाविकास आघाडीचे वागणं बघितल्यानंतर ते मराठा समाजाशिवाय दुसरं कोणालाच आणणार नाहीत अशी परिस्थिती आहे.  त्याच्यामुळे ओबीसीची जी मागणी जातनियाहाय जनगणनेची तीच पद्धत वापरण्यात येईल. विधानसभेमध्ये दुसरा ठराव मंजूर केला जाईल की जनगणनेची आकडेवारी आल्यानंतर आपण याची अंमलबजावणी करतो तोपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. एकदा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये असं ठराव मंजूर झाला की मग आपल्याला कोर्टात जाता येत नाही अशी परिस्थिती आहे.  तेव्हा तो मार्ग विधानसभेनंतर अवलंबतील. यासंदर्भात त्यांच्या बैठका देखील झाल्याची माहिती आहे.  हा ठराव होऊ द्यायचा नसेल तर ओबीसी समाजाचे किमान 100 आमदार विधानसभेत पाठवावे. 


महाविकास आघाडी आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यायची टाळत आहे :  प्रकाश आंबेडकर 


महाविकास आघाडीमधील काँग्रेस,राष्ट्रवादी शिवसेना यांची मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यायची टाळत आहेत. शिवसेना केंद्राकडे बोट दाखवते, राष्ट्रवादी मणिपूर दाखवते आणि काँग्रेस वेट अँड वॉच भूमिका घेत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी लोकसभेसारखीच संदिग्ध भूमिका घेईल आणि त्यातून राजकीय हित फायदा करून घेईल, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


मराठा आरक्षणाला पाठिंबा, मात्र दोघांची ताट वेगळी पाहिजे : प्रकाश आंबेडकर 


 मराठा आरक्षणाला माझा आजही पाठिंबा आहे.  ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजासाठी वेगळं ताट असले पाहिजे. 55 लाख दिलेले सर्टिफिकेट हे चुकीचे आहेत आणि सगळे सोयऱ्यांची संकल्पना देखील चुकीची आहे या दोन्ही गोष्टींचा विरोध आहे, असे आंबेडकर म्हणाले.  


विधनसभेला जरांगे पाटलांनी 288 जागा लढवाव्यात: प्रकाश आंबेडकर


जरांगे पाटील श्रीमंताचे पुढारी नाहीत. लोकसभेत गरीब मराठ्यांना संधी दिली नाही. त्यामुळे विधानसभेत जरांगे पाटील यांनी 288 जागा लढवाव्यात. मात्र मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र आणि सगे सोयरे याला माझा विरोधच प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली  आहे.


हे ही वाचा :


SC/ST Reservation: एससी, एसटी जातींच्या वर्गवारीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल, ओबीसीप्रमाणे क्रिमीलेअरचा निकष लागू होणार