Prakash Ambedkar On Raj Thackeray : शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत आहे असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)   यांनी केला होता.  त्यावर वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, अशा लोकांवर ताडा कोर्ट लागला पाहिजे.  त्यांना कारागृहात टाकून मोकळं व्हायला पाहिजे. ते अमरावतीत माध्यमांशी बोलत होते. 


प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रातला माणूस यूपीमध्ये आहे. ओडिशामध्ये आहे.  महाराष्ट्रातील माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे. मध्यप्रदेशात आहे. गुजरातमध्ये सुद्धा आहे त्यांचं काय करायचं? समाज दुभंगण्याची ही वक्तव्य आहेत, समाज दुभंगला की देश दुभंगतो.  युएपीए आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट यांच्यावर लागला पाहिजे.  सरकारने हिंमत  दाखवावी.


ज्याचं काही अस्तित्व नाही त्यावर मी बोलणार नाही : प्रकाश आंबेडकर 


ओबीसी हा मराठ्याला आणि मराठा ओबीसीला मतदान करणार नाही. आपलं आरक्षण जातंय,  याची जाणीव झालेली आहे.  मराठवाड्यातून विदर्भात आलो तेव्हा पहिली बैठक ओबीसीसोबत झाली विदर्भातला कुणबी हा ओबीसी आहे. पण ऐरणीची वेळ आली तर हा कोणासोबत असेल? असा  सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. तसेच   बच्चू कडू तिसऱ्या आघाडीच्या तयारीत आहे यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्याचं काही अस्तित्व नाही त्यावर मी कमेंट करणार नाही.   


 खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची : प्रकाश आंबेडकर 


जी शिवसेनेची मत आहे ती एकनाथ शिंदे सोबत राहील.  खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे कारण उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा मुस्लिम समाजामुळे वर आला  आहे, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


आरक्षण बचाव यात्रेमुळे काही जणांचे मनसुबे उद्ध्वस्त  झाले : प्रकाश आंबेडकर 


प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले,  आरक्षण बचाव यात्रा सुरू केली.  याला यश मिळालं आहे. जरांगे पाटील यांची जी मागणी आहे, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या यात दोन गट पडले .एक मराठा आणि दुसरा ओबीसी... मात्र  काही जणांचे मनसुबे या यात्रेतून ते उध्वस्त झाले आहेत. 


Prakash Ambedkar On Raj Thackeray Video : राज ठाकरेंसारख्या व्यक्तींवर टाडा लावला पाहिजे : प्रकाश आंबेडकर



हे ही वाचा :


Raj Thackeray: शरद पवारांनी महाराष्ट्राचं मणिपूर करायला हातभार लावू नये, त्यांचं आजपर्यंत राजकारण पाहता... राज ठाकरेंना टोला