Prakash Ambedkar on Uddhav Thackeray :  "काँग्रेस - बाळासाहेब थोरात आणि एनसीपी - शरद पवार हे दोघे मराठा आणि जरांगे पाटील हे पण मराठा आहेत. राजकीय पक्ष असाल तर कोणाची भूमिका काय आहे ते सांगा.  जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा आहे की विरोधात आहात स्पष्ट करा. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष ओबीसीच्या विरोधात आहेत.  भाजप आणि उद्धव ठाकरे हे ब्राम्हण कायस्थ नेतृत्व आहे त्यामुळे ते ही भूमिका घेणार नाही.  निवडणुकीपर्यंत कोणताच राजकीय पक्ष भूमिका घेणार नाही. त्यामुळे स्वतःचा लढा स्वतः लढवा लागेल", असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते. 


ओबीसी संघटनांना माझं आवाहन आहे, त्यांनी आपापल्या समाजाशी बोलले पाहिजे


प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसी संघटनांना माझं आवाहन आहे की त्यांनी आपापल्या समाजाशी बोलले पाहिजे. जसं मुसलमान म्हणतो इस्लाम खतरे में हैं तस ओबीसी जो धर्म पाळतो तो खतरे में आहे का? ओबीसी वाडवडिलांच्या धर्माचा त्याग करणार आहेत का? तुम्ही जर त्याग करणार नसाल तर धोका नाहीये.  बीजेपीला ओबीसी आपला पक्ष मानतो. ओबीसीने भाजपमधील आपल्या समाजातील लोकांना विचारलं पाहिजे. जरांगे पाटील यांची मागणी काय आहे हे विचारलं पाहिजे. जरांगे यांच्या मागणीला विरोध केला तर भाजप ओबीसीचा पक्ष आहे असं आपण मानू. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीबद्दल उद्धव ठाकरे यांनी एक ही शब्द काढला नाही, याचा अर्थ हे पक्ष स्वतः च्याच समाजाचा विचार करतात. ते  कायस्थ ब्राम्हणांचाच विचार करतात उरलेल्याचा विचार करत नाहीत.


पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, भीतीतून बाहेर पडायचे असेल तर संघटीतपणा दाखवणे गरजेचं आहे. त्यातून ताकद दिसून येते. येत्या 7 तारखेला स्वतःच्या वाहनाने औरंगाबादच्या सभेला ओबीसीने पोहचलं पाहिजे. ते जर ओबीसी करू शकला नाही तर आमच्या सारखे कितीही आले तरी ओबीसी आरक्षण वाचू शकणार नाहीत. समाजाचे आम्ही 225 आमदार निवडून आणणार,शरद पवार यांचं असं विधान होतं, त्यांच्या जे पोटात होत ते ओठात आलं. हे वास्तव ओबीसीने ओळखलं पाहिजे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Rajesh Tope on Kalyan Kale : निलेश लंके लुकडा सुकडा पैलवान, कल्याण काळेंनी उमेदवारी घेतली नसती तर ती माळ माझ्या गळ्यात पडली असती : राजेश टोपे