जळगाव : सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यातच आरक्षण (Reservation) कायमचं संपलं पाहिजे, या मुद्द्यावर काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP), उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shiv Sena UBT) व भाजप (BJP) हे चारही पक्ष एक आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. जळगाव (Jalgaon News) येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जरांगे पाटील त्यांची मागणी शासनाने सोडवली नाही म्हणून तो आता कळीचा मुद्दा झाला आहे.  ओबीसी समाजातून आरक्षण द्यावं, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीवर राजकीय पक्षांनी भूमिका घेतलेली नाही.  ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये ही भूमिका ओबीसी समाजाने घेतली आहे. ओबीसींच्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


आरक्षणाच्या मुद्द्यावरच निवडणुका होणार 


तर रत्नागिरीच्या सभेमध्ये शरद पवारांनी जरांगे पाटलांची मागणी योग्य असल्याचे म्हणत त्यांना पाठिंबा दिला. शरद पवारांच्या पाठिंब्यानंतर ती भूमिका राष्ट्रवादीची आहे, असे स्पष्ट होते. ओबीसींचे आरक्षण हे ओबीसींनाच राहिलं पाहिजे. त्यामध्ये इतर कोणाचाही समावेश होता कामा नये, ही वंचित आघाडीची भूमिका आहे. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर वेगळं आरक्षण द्यावं. राज्यात आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून यावरच विधानसभेची निवडणूक लढली जाईल, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. 


काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना व भाजप


आघाड्यांचे राजकारण हे चालत राहील. आरक्षण कायमचं संपलं पाहिजे या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना व भाजप हे चारही पक्ष एक आहेत. आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी कायम लढा देईल व रस्त्यावर उतरून आरक्षण वाचवण्याचं धोरण आणणार आहे. या निवडणुकांमध्ये होणारे ध्रुवीकरण हे सामाजिक दृष्टिकोनातून होणार आहे. या निवडणुकांमध्ये आरक्षणावरून ध्रुवीकरण होणार आहे. ज्यांना आरक्षण मिळते ते एका बाजूला ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आरक्षण संपलं पाहिजे अशी भूमिका घेतली आहे ते एका बाजूला राहतील. ओबीसी फॅक्टर आरक्षण वाचलं पाहिजे याचं नेतृत्व करणार व मराठा आरक्षण विरोधी नेतृत्व करणार, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.  


आणखी वाचा 


संजय राऊत म्हणतात आमच्यात कुठलेही भांडण नाही, तर भाजपसोडून इतर कोणत्याही पक्षासोबत जाण्याची प्रकाश आंबेडकरांची तयारी!