Delhi Traffic Police: दिल्लीतील लाल किल्ला परिसरात ‘हर घर तिरंगा’ बाईक रॅलीदरम्यान हेल्मेट न घातल्याबद्दल दिल्ली वाहतूक पोलिसांनी बुधवारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार मनोज तिवारी यांना दंड ठोठावला. दिल्ली वाहतूक पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
यानंतर आपण दंड भरणार असल्याचे तिवारी यांनी ट्वीट करत सांगितले. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “आज हेल्मेट न घातल्याबद्दल मनापासून खेद वाटतो. मी दंड भरेन. तुम्हा सर्वांना विनंती आहे की हेल्मेट न घालता दुचाकी चालवू नका.''
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मनोज तिवारी याना हेल्मेट न घालणे, विना परवाना आणि पीयूसी नोंदणी प्रमाणपत्राशिवाय बाईक चालवल्याबद्दल चालान बजावण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, दुचाकीच्या मालकालाही दंड ठोठावण्यात आला आहे.
भाजप दिल्लीने तिरंगा बाईक रॅली काढली
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या 'आझादी का अमृत महोत्सवा'अंतर्गत केंद्रीय मंत्री आणि खासदारांसह अनेक खासदारांनी बुधवारी लाल किल्ल्यावरून 'तिरंगा बाईक रॅली'ला सुरुवात केली. देशातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वाढावी, या उद्देशाने ही तिरंगा बाइक रॅली काढण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या:
National Herald Case: ईडीकडून दिल्लीतले यंग इंडियाचे कार्यालय सील, नॅशनल हेराल्ड प्रकरणी कारवाई
Election : शिंदेंचा ठाकरेंना धक्का; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017 प्रमाणेच, वाढवलेले वॉर्ड रद्द
Uddhav Thackeray : नागाला कितीही निष्ठेचं दूध पाजलं तरीही तो चावतोच, बंडखोरांवर उद्धव ठाकरेंची जहरी टीका