मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मोदींची नाशिकमध्ये दिंडोरी मतदारसंघात (Nashik News) आज पहिली सभा होणार आहे.  पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजारसमिती जवळ 12 वाजेपर्यंत या सभेला सुरूवात होईल. दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकार विरोधात नाराजी असल्याची चर्चा आहे. काही शेतकऱ्यांनी  मोदींना  जाब विचारणार असा इशारा दिला होता.  सुरक्षेच्या कारणास्तव इशारा देणाऱ्या  पाच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पाच  शिवसैनिकांना  निफाड पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेत अज्ञात स्थळी नजरकैदेत ठेवले आहेत. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर   विविध कांदा उत्पादक संघटना यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे.मोदींच्या सभेत  कोणता गोंधळ नको म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे असा आरोप केला आहे. महायुतीच्या प्रचारार्थं नाशिकच्या पिंपळगाव येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी मोदी यांनी विविध भाषणात दिलेल्या आश्वासनाबाबत जाब विचारण्याचा इशारा देणाऱ्या पाच शिवसैनिकांना (उध्दव ठाकरे गट) निफाड पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेत अज्ञात स्थळी नजरकैदेत ठेवले. पोलीस वरिष्ठांच्या आदेशान्वये या पाच जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.  


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात आंदोलनाची  शक्यता


कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा गाजलेला विषय, केंद्र सरकारने घेतलेले निर्णयात धोरणाचा निर्णय, त्यावर शेतकऱ्यांची असलेली  या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होत आहे. कांदा प्रश्नावरुन शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात आंदोलनाची  शक्यता आहे. त्यामुळे  पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर  स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.  ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनाही नोटीस दिली आहे.  कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनाही नोटीस दिली आहे. 


पंतप्रधान मोदींचा घाटकोपरमध्ये भव्य रोड शो


 कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकार विरोधात नाराजी असल्याची चर्चा आहे.त्यामुळे पंतप्रधान मोदी यासंदर्भात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. दिंडोरी, धुळे आणि नाशिक मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.नाशिकच्या सभेनंतर कल्याण आणि भिवंडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींची सभा होणार आहे .कल्याणमध्ये ही सभा होणार असून या सभेची जोरदार तयारी करण्यात आलीय.जवळपास  हजार लोकांना बसण्याची सोय या मंडपात करण्यात आलीय. या सभेनंतर पंतप्रधान मोदींचा घाटकोपरमध्ये भव्य रोड शो होणार आहे. भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी हा रोड शो होणार आहे. 


हे ही वाचा :


PM Modi Jiretop: प्रफुल पटेलांनी मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला; शिवप्रेमी संतापले, विरोधकांची आगपाखड