नवी दिल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय भाकितं वर्तवण्यासाठी रोज पत्रकार परिषदं घेणाऱ्या शिवसेन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut)  आज नवा दावा केलाय. लोकसभा अध्यक्षांची निवड झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)  ही जोडी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष फोडतील असा दावा राऊतांनी केलाय. चंद्रबाबा नायडूंनी लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केल्याचं कानावर आल्याचं राऊत आवर्जून म्हणाले.  


लोकसभा अध्यक्षपद महत्त्वाचं, चंद्राबाबू नायडूंना लोकसभा अध्यक्षपदासाठी समर्थन देण्याचा विचार करु. चंद्रबाबू नायडू यांचा मी नाव ऐकत आहे ते जर त्यांना लोकसभेचे अध्यक्ष पद राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला मिळालं नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे तेलगू देशम चंद्रबाबू नायडूंचा पक्ष आणि नितेश कुमारचा पक्ष हे फोडून  त्याचा चिरफल्या केल्याशिवाय राहणार नाही, असे राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट ही भाजपची परंपरा आहे, असा हल्लाबोल देखील राऊतांनी केला.


ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट, ही भाजपची परंपरा  : संजय राऊत


संजय राऊत म्हणाले, लोकसभेचे अध्यक्ष पद एनडीएच्या घटक पक्षाने मागितलेले आहे. चंद्रबाबू नायडू यांचा मी नाव ऐकत आहे.लोकसभेचे अध्यक्ष पद राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला मिळालं नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे तेलगू देशम चंद्रबाबू नायडूचा पक्ष आणि नितेश कुमारचा पक्ष हे फोडून  त्याचा चिरफल्या केल्याशिवाय राहणार नाही.लोकसभेचे अध्यक्ष पद हे अत्यंत महत्त्वाचा असते.  महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे जे भारतीय जनता पक्षांचे पॉलिटिकल एजंट होते त्या पदावर त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीने फुटल्याचं  जाहीर करण्यात आले. विधिमंडळात पक्ष फुटू शकतो विधिमंडळात जरी पक्षा फुटला तरी ज्या पद्धतीने निकाल दिलेला आहे नार्वेकरांनी अत्यंत बनावट पद्धतीने म्हणजे सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचा व्हीप हा बेकायदेशीर असल्याचे सांगितले.  शिंदे यांची निवड बेकायदेशीर असल्याचे सांगितले. या सगळ्या गोष्टी राज्यपालांची संपूर्ण कार्यवाही बेकायदेशीर असल्याचे सांगितले. तरीही राहुल नार्वेकर अत्यंत घटनाबाह्य पद्धतीने निकाल दिला तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल तर दिला जाऊ शकतो. भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट ही भाजपची परंपरा आहे .


राहुल गांधी आणि आम्ही कोणत्या क्षणी सरकार पाडू शकतो : संजय राऊत 


संजय राऊत म्हणाले,  देशाच्या जनतेनं नरेंद्र मोदी यांना झिडकारले आहे नाकारले आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव केला. मोदींच्या झुंडशाहीचा  हुकूमशाहीचा संविधान विरोधी कृतीचा पराभव केलाय.  त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीने निवड होणे गरजेचे आहे.  पारदर्शक पद्धतीने उपाध्यक्ष पद हे आता कायद्याने, घटनेने विरोधी पक्षाला मिळाला हवं. आता नरेंद्र मोदींचा काय तामझाम राहिलाय मला सांगा. टेकूवर बसले आहे. टेकू कधीही पडू शकतो. राहुल गांधी आणि आम्ही कोणत्या क्षणी सरकार पाडू शकतो. 


नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे : संजय राऊत


मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ भेटीवर राऊत म्हणाले,  दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेते पदी निवड झालेली नाही.  राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड झाली अशी माझी माहिती आहे.  जर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेते पदाचा प्रश्न आला असता तर वेगळा निर्णय दिसला असता म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडी च्या घटक पक्षाची बैठक बोलून भाजपसह त्या बैठकीमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यात आलं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे.  नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो.


हे ही वाचा :


निलेश लंके मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला, रुग्णालयात जाऊन केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले आरक्षणावर तोडगा निघालाच पाहिजे