मुंबई :  शिवसेनेचे पालघरचे खासदार (Palghar Lok Sabha Election)    राजेंद्र गावित (Rajendra Gavit)   स्वगृही परतणार आहे.  आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश  होणार  आहे.   थोड्याच वेळात भाजपच्या मुंबई पक्ष कार्यालयात हा  प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.   यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  हजरदेखील राहणार आहेत.   पालघरमधून यंदा शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने गावित नाराज असल्याची चर्चा  आहे. याच नाराजीतून ते स्वगृही  परत असल्याची चर्चा आहे.  


 पालघर लोकसभेसाठी विद्यमान खासदार राजेंद्र गावितांना उमेदवारी नाकराल्यामुळे त्यांनी आपली नाराजी उघडपणे  बोलून दाखवली आहे.  दिल्लीसह राज्यातून सातत्यानं उमेदवारी देण्याचं आश्वासन देण्यात आलं.लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे हेमंत सावरा यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर राजेंद्र गावितांनी  महायुतीच्या रॅलीला देखील पाठ फिरवली होती.  तिकीट कापलं गेल्यामुळं गावित यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली


राजेंद्र गावितांच्या नावाची चर्चा 


महायुतीमार्फत राजेंद्र गावित यांचे नाव उमेदवार म्हणून चर्चेत होते.  परंतु  महायुतीमध्ये गावितांच्या  नावाला विरोध होता.   उमेदवार म्हणून गावितांना भाजपचा तीव्र विरोध होता.  भाजपमार्फत दिवंगत माजी आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांची सुपुत्र डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली जावी यासाठी भाजप अतिआग्रही होते.  


काँग्रेस- भाजप- शिवसेना- शिंदे गट आणि आता परत भाजप 


शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रवेश केला होता. त्यावेळीखासदार राजेंद्र गावित यांनी देखील प्रवेश केला होता. 2018 साली गावितांना तिकिट नाकारल्याने  गावितांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. 


कोण आहेत राजेंद्र गावित?


राजेंद्र गावित हे आदिवासी समाजातील मोठा चेहरा आहेत. काँग्रेसमध्ये असताना ते आदिवासी विकास राज्यमंत्री होते. ते मूळचे नंदुरबारचे आहेत. पालघरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 सालची लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढले, मात्र पराभूत झाले. 2016 साली विधानसभा पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. 2019 साली राजेंद्र गावितांनी   शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला. राजेंद्र गावित यांना 2 लाख 72 हजार 782 मतं मिळाली होती. राजेंद्र गावित 29 हजार 572 मतांनी विजयी झाले होते. 


हे ही वाचा:


Rajendra Gavit: नाराज गावितांची महायुतीच्या रॅलीला पाठ, पालघरमधून थेट पकडला जव्हारचा रस्ता