मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये (Nandurbar) दाखल झाली आहे. मात्र त्याआधीच काँग्रेसला नंदुरबारमध्येच मोठा धक्का बसला आहे. नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी (Padmakar Valvi) भाजपच्या वाटेवर आहेत. पद्माकर वळवी यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली. पद्माकर वळवी हे 13 मार्चला म्हणजेच उद्या बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी मंत्री, काँग्रेसचे नेते म्हणून वळवींनी काम केलं आहे.


कोण आहेत पद्माकर वळवी? (Who is Padmakar Valvi)


पद्माकर वळवी हे नंदुरबारमधील शहादा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. पद्माकर वळवींनी राज्याच्या क्रीडा खात्याची धुरा सांभाळली आहे. ते मंत्री होते. नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या चेहऱ्यापैकी एक म्हणून पद्माकर वळवींची ओळख आहे. 2009 मध्ये ते शहादा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला. 


नंदुरबारचे पालकमंत्री


पद्माकर वळवी हे तेराव्या विधानसभेत आमदार होते. त्यावेळी त्यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही होतं.  पद्माकर वळवी यांच्या पत्नीही राजकारणात आहेत. त्या सध्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. 


दोन वर्षांपासून भाजप प्रवेशाची चर्चा


दरम्यान, पद्माकर वळवी हे भाजपमध्ये जाणार, भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. मात्र पद्माकर वळवींनी या चर्चा नेहमीच फेटाळल्या. मात्र आता चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेऊन, त्यांनी अखेर भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरवला आहे. 


राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नंदुरबारमध्ये


आदिवासी आणि वनवासी या शब्दातील फरक तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही आदिवासी आहेत का वनवासी? तुम्हाला आदिवासी म्हणजे काय माहित आहे का? आदिवासी शब्दाचा आर्थ देशाचे ओरिजनल मालक आहेत. ज्या वेळी देशात कोणीच नव्हते त्या वेळी आदिवासी होते. भारताची जी संपत्ती आहे त्याचे ओरिजनल मालक तुम्ही आहेत. आदिवासी या शब्दसोबत जंगल,पाणी जोडले गेले आहे. म्हणून आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतोय आणि भाजप वनवासी म्हणते आहे. 


आधार कार्ड आदिवासी भागातून का प्रोजेक्ट केले? कारण तुम्ही या ठिकाणचे ओरिजनल मालक आहेत. हळू हळू जंगल आणि जमिनी या अदाणीला सरकार देत आहे. आता जमिनी राहिल्या नाहीत.  तुम्हाला भिक मागायला हे सरकार लावत आहे. नरेंद्र मोदींनी आदिवसींचे एक रुपये कर्ज माफ केले नाही. उद्योगपतींना कर्ज माफ केले. 16 लाख करोड माफ केले. मनरेगाचे 24 वर्षाचे बजेट केवळ 22 लोकांवर खर्च केले. देशात आदिवासींची संख्या 8 टक्के आहे.तर प्रश्न हा भागीदारीचा आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 


संबंधित बातम्या


मोठी बातमी! संभाजीनगरची जागा ठाकरे गटाकडेच, थेट उद्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन