Onion : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले आहे, याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. कांद्यावर 550 डॉलर प्रति मेट्रिक टन निर्यात मूल्य लागू होते. केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने याबाबतचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मोठा दिलासा मिळालाय. मात्र शेतकऱ्यांना हा निर्णय ' कभी खुशी कभी गम ' देणारा असल्याचे बोलले जात आहे. 


550  डॉलर निर्यातमूल्य रद्द करण्याचा अध्यादेश 


केंद्र सरकारने अधिसूचना काढत कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले. ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी असल्याचे बोलले जात आहे. कांदा निर्यात वरील 550 डॉलर निर्यातमूल्य रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे कांदा निर्यातीला चालना मिळणार आहे. 550  डॉलर निर्यातमूल्य रद्द करण्याचा अध्यादेश वाणिज्य मंत्रालयातील विदेश आणि व्यापार विभागाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी काढला आहे. तर कांदा निर्यात शुल्क 40 टक्के वरून 20 टक्के करण्याचा येणार लवकरच निर्णय माहिती सूत्रांनी दिली आहे. 


निर्यातबंदी संदर्भात यापूर्वी आलेल्या अधिसूचना...


-  19 ऑगस्ट 2023 कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले होते...
- 28 ऑक्टोबर 2023 ला कांद्यावर 800 डॉलर प्रति मेट्रिक टन निर्यातमूल्य लावले होते..
- 7 डिसेंबर 2023 निर्यातबंदी करण्यात आली होती...
- 4 मे निर्यातबंदी उठवली मात्र निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले होते आणि ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य लावण्यात आले..
- आज कांदा निर्यात वरील 550 डॉलर निर्यातमूल्य रद्द..


गेल्या 20 दिवसांपासून कांद्याचे भाव कडाडले होते. विशेषत: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कांद्याची सरासरी किंमत 58 रुपये प्रतिकिलो आहे. तर संपूर्ण भारतीय कांद्याचा कमाल दर 80 रुपये प्रति किलो आहे. अशा स्थितीत सरकारच्या या निर्णयाचा कांद्याच्या दरावरही परिणाम होणार आहे.


महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे कांदा निर्यात करणारे राज्य आहे. सरकारच्या या पाऊलांमुळे शेतकऱ्यांना कांदा निर्यात करण्यास मदत होणार आहे. याआधी शनिवारी, 4 मे 2024 रोजी देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली होती. परंतु किमान निर्यात किंमत (MEP) $550 प्रति टन निश्चित करण्यात आली.


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar: निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांची ताकद वाढणार? 'हे' बडे नेते हाती तुतारी घेण्याच्या तयारीत; वाचा ABP माझाचा स्पेशल रिपोर्ट