Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात आमदार उभे केले आहेत. ही त्यांची चाल आहे. मराठा का संपवायला निघाला आहात? 106 आमदार मराठ्यांनी निवडून दिले आहेत. आम्ही आमचे आरक्षण मागत आहोत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी आहे, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केली आहे. शिरूर मतदार संघातील पिंपळवंडी येथील घोंगडी बैठकीतून ते बोलत होते.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही ही सर्वांची इच्छा आहे. हा समाज बलाढ्य आहे. समाज प्रगत होईल म्हणून आरक्षण मिळू द्यायचं नाही. अनेक जणांनी देव पाण्यात ठेवले आहेत. राजकीय पक्षातील लोक आपल्यात फूट पाडत आहेत. फूट पडण्यासाठी सरकारने आंदोलन उभे केले असल्याची टीका त्यांनी केली आहे.
हैदराबाद गॅझेट लागू करायला अडचणी काय आहेत?
ते पुढे म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे भावनिक केलं जाणार आहे. प्रत्येक राजकीय नेता पक्ष वाचवण्यासाठी निघाला आहे. अफाट संपत्ती केवळ मराठा समाजाच्या जीवावर आहे. हीच अवलाद मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाही. आरक्षणावर कोणीच बोलायला तयार नाही. सगे सोयरेची अधिसूचना काढली, आठ महिने झाले तरीही अंमलबजावणी नाही. हैदराबाद गॅझेट लागू करायला अडचणी काय आहेत? ही अडवणूक कशामुळे सुरू आहे. सरकारची भूमिका कळायला तयार नाही.
जो आमदार बोलणार नाही त्याला पाडायचं
मराठा आणि कुणबी एकच आहे. मराठे जे मागतात ते तुम्ही देत नाही आणि जे आम्ही मागत नाही ते तुम्ही देता, यात आमची चूक काय आहे? ईडब्लूएस रद्द करण्याचा घाट का घातला? सरकार याचे उत्तर देत नाही. देवेंद्र फडणवीस सर्व चालवतात त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही मागतो. सरकारने अधिवेशन बोलवावं, जो आमदार बोलणार नाही त्याला पाडायचं. नाटक कंपनीने नौटंकी करायची नाही, अधिवेशन बोलवायचं मग समाज बघेल कोणता आमदार बोलणार नाही. यांना अधिवेशन ठेवायचं नाही हे नाटक आणि बहाणा आहे, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी
आता फूट पडू द्यायची नाही आणि कोणत्याही नेत्याला घाबरायचं नाही. 2024 ला एका-एका काठीचा हिशोब घ्यायचा आता सुट्टी नाही. माझ्या विरोधात खूप टोळ्या आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात आमदार उभे केले आहेत ही त्यांची चाल आहे. मराठा का संपवायला निघाला आहात? 106 आमदार मराठ्यांनी निवडून दिले आहेत. आम्ही आमचे आरक्षण मागत आहोत. माझे कर्तव्य मी पार पाडत आहे. मी सरकारला मॅनेज होत नाही. त्यांनी माझ्याविरोधात आंदोलन उभे केले आहे. मी एकटा वटणीवर आणतो. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी आहे, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
आणखी वाचा
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य