Nitin Gadkari : सरकार ही बिनकामाची गोष्ट आहे, तर राजकारण हे फुकट्यांचं क्षेत्र आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे. महापालिका तसंच एनआयटी यांच्या भरवशावर कोणतंही काम करता येत नाही, असंदेखील नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. नागपूर स्टेडियम उभारण्याच्या संदर्भात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, माणूस नशेत असतो तेव्हा विचार करणे बंद करतो. खेळाची नशा असते, राजकारणाची नशा असते, तर कोणाला ज्ञानाची पण नशा असते. माणूस या नशेत जेव्हा काम करतो तेव्हा तो विचार करायचे बंद करतो. जेव्हा त्याला यश मिळते तेव्हा त्याला त्याची सवय होते. सूत्रसंचालन करताना ज्या व्यक्तीने माझी स्तुती केली, ते मला चांगलं वाटलं. पण, त्यांनी केलेली स्तुती खरी आहे, असे म्हणालो तर माझ्यावर अन्याय असेल आणि खोट आहे असे मी म्हणालो तर त्याच्यावर अन्याय होईल. सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य हे नियमित राहणार नाही तर हे क्षणिक आहे. जेव्हा तुमच्याकडे संधी असते यापैकी अमिताभ बच्चन यांच्यासारखे खूप कमी लोक आहेत. जे सुरुवातीला जेवढे प्रसिद्ध होते तेवढेच 80 वर्षाचे झाले तरी प्रसिद्ध आहेत. येथे लोकं रोज पत्ते बदलवत असतात. एक चित्रपट चालतो तर दुसरा चित्रपट डब्यात जातो, असेच खेळांमध्ये देखील करिअर घडू शकते. आपल्याला 75 ते 80 वर्षापर्यंत चांगल जीवन कसे जगता येईल याची व्यवस्था करून ठेवायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे.
सरकार म्हणजे बिनकामाची गोष्ट
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, जेव्हा आपले चांगले दिवस असतात तेव्हा याबद्द्ल आपल्याला विचार करायला हवा. चांगले दिवस असताना समोरून स्तुती करणारे खूप मिळतात. कारण, तेव्हा क्रेझ ग्लॅमर असते. पण जेव्हा आपली वेळ संपते तेव्हा कोणी विचार करत नाही. म्हणून या क्षेत्रात नियमित आपला विचार करावयचा असेल तर करिअर बनवा. माझी खूप इच्छा आहे की, नागपुरात 300 स्टेडियम खेळण्यासाठी बनवावे. पण माझ्या चार वर्षाच्या करिअरमध्ये माझ्या लक्षात आलं की, सरकार म्हणजे बिनकामाची गोष्ट आहे. महापालिका तसेच एनआयटी यांच्या भरवशावर कोणतेही काम होत नाही. चालत्या गाडीला पंक्चर करायचा अनुभव यांच्याकडे असतो, असे त्यांनी म्हटले.
राजकारण फुकट्यांचा बाजार
एक व्यक्ती दुबईवरून माझ्याकडे आला आणि म्हणाला मी दुबईत स्पोर्ट स्टेडियम चालवतो. मी विचारलं कसे चालवता तर तो म्हणाला की, 15 वर्षाचा टेंडर देणार, लाईट आम्ही देणार, पाण्याची व्यवस्था, कपडे बदलण्याची व्यवस्था आणि मग देखभाल तो करणार, खेळण्यासाठी येणाऱ्या मुलाकडून तो 500 किंवा हजार रुपये शुल्लक फी घेणार, फुकटात कोणालाही शिकवायला नाही पाहिजे, असे त्याने म्हटले. मी तर राजकारणात आहे. इथे तर सर्व फुकट्यांचा बाजार असतो. सर्व वस्तू फुकटात हवी असते. मी फुकटात देत नाही, असे देखील नितीन गडकरी यांनी म्हटले.
आणखी वाचा