Bjp On Sanjay Raut: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचं आज मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी जंगी स्वागत केलं. यावेळी शेकडोच्या संख्येने शिवसेनाचे कार्यकर्ते विमानतळावर जमले होते. ढोल-ताशांच्या गजरात राऊतांच स्वागत करत शिवसेनेने आपले शक्तिप्रदर्शन केल्याचं बोललं जात आहे. आता यावरूनच भाजपने संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावरच बोलताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले आहेत की, संजय राऊत अशी कोणती लडाई जिंकली आहे, जे त्यांचे खांद्यावर बसून स्वागत केले जात आहे. संजय राऊत 420 माणूस आहे, असं ते म्हणाले आहेत. राऊत यांनी चोरी केली आहे, भ्रष्टाचार केला आहे आणि हे सिद्ध झालं आहे, असं ते म्हणाले.
राऊतांच्या शक्तिप्रदर्शनाला शिवसेनेचे एकही मोठे नेते उपस्थित नाही
राऊत यांनी टीएमसी बँकेतील लोकांचे पैसे खाले असून ईडीने हे सिद्द केलं आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत. ते म्हणाले की, राऊत यांच्या शक्तिप्रदर्शनाला शिवसेनेचे एकही मोठे नेते उपस्थित नव्हते. त्यांच्या शक्तिप्रदर्शनाला त्यांचे भाऊ, विनय राऊत आणि कुठले तरी एक आमदार उपस्थित होते. या व्यतिरिक्त कोणतेही मोठे नेते उपस्थित नव्हते. शिवसेनेत राऊत एकटे पडले असून ते घाबरले आहेत म्हणून शक्तिप्रदर्शन करत असल्याचे राणे म्हणाले आहेत.
असं शक्तिप्रदर्शन करून काही होणार नाही: दरेकर
राऊत यांना टोला लगावत विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले आहेत की, ''ही शिवसैनिकांची गर्दी जमली नाही, तर ही गर्दी जमवण्यात आली आहे.'' ते म्हणाले, अशा प्रकारे शिवसनेच्या नेत्यावर कारवाई झाल्यानंतर भविष्यात अशा आणखी कारवाई होणार की काय, यातूनच आक्रमक पवित्र घेत हे शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. मात्र असं शक्तिप्रदर्शन करून काही होत नाही, असं ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- पीएमसी बँकेच्या माध्यमातून सोमय्यांनी मनी लॉंड्रिंग केले; संजय राऊतांचा आरोप
- संजय राऊतांनी सामनाच्या कार्यालयात मला धमकावून 25 लाख रुपये घेतले : मोहित कंबोज
- Shivsena Protest : किरीट सोमय्यांच्या विरोधात शिवसेनेचं ठिकठिकाणी आंदोलन, तातडीनं अटक करण्याची मागणी
- Kirit Somaiya on INS Vikrant : आयएनएस विक्रांतचा निधी कुठं गेला, किरीट सोमय्यांनी म्हटले....
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha