Asawari Joshi : प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी (Aasavari Joshi) यांनी आज (7 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. 'कलाकारांचे आणि जनतेचे प्रश्न सोवडण्याचा प्रयत्न करणार', असं त्यांनी यावेळी सांगितलय.
आसावरी जोशी म्हणाल्या, 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित मी प्रवेश केला त्यांचे मी मनापासून आभार मानते. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, चित्रपट आणि संस्कृतीक विभाग या पदी माझी निवड झालेली आहे कलाकारांचे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी निश्चित करेन.' आसावरी जोशी यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
आसावरी जोशी यांनी अभिनयानं जिंकली प्रेक्षकांची मनं
1986 मध्ये आलेल्या 'माझं घर, माझा संसार' या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पन केलं होतं. या चित्रपटात त्यांनी साकारलेली सुमनची भूमिका प्रेक्षकांना फारच भावली होती. 2001 मध्ये दुरचित्रवाणीवरील 'ऑफिस-ऑफिस' या हिंदी मालिकेतील त्यांच्या अभिनयाची मोठी चर्चा झाली होती. त्यांनी 'सुवरी' या नाटकात अभिनय केला होता. त्यांचा पहिला बॉलीवूड चित्रपट 'प्यार जिंदगी है' हा होता. जोशी यांनी 1989 मध्ये 'धाम धूम' आणि 'एक रात्र मंतरलेली' या चित्रपटांत काम केले. तर 1991 मध्ये ‘गोडी गुलाबी’ या मराठी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला आहे. आसावरी जोशी यांची 1993 मध्ये दुरदर्शनवर आलेली मालिका 'जबान संभालके' मालिकेतील कन्याकुमारीची भूमिका फारच गाजली होती. 'सुखी संसाराराची 12 सुत्रे' आणि 'बाल ब्रह्मचारी' यासारख्या चित्रपटांचाही आसावरी या भाग होत्या. त्यांची 'फॅमिली नंबर 1' या मालिकेतील शालिनीची भूमिकाही फार गाजली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
- आयएनएस विक्रांतसाठी जमा केलेल्या पैशांचे PMC बँक कनेक्शन? राऊतांच्या आरोपाने खळबळ
- Sanjay Raut : सोमय्यांची वकिली करण्यापेक्षा फडणवीसांनी त्यांना चार जोडे हाणावेत; राऊतांचा हल्लाबोल