सिंधुदुर्ग: आमच्याजवळ जी  माहिती होती ती आम्ही लोकांसमोर आणली. हा फार मोठा धोका आहे. वक्फ बोर्ड कायदा आपल्या देशात आहे, तो आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतं तर एवढ्यात जिल्ह्यातील 50 ते 60 टक्के जमीन यादीप्रमाणे 156 ठिकाणची जागा देऊन टाकली असती. अशी टीका  मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे.


जिल्ह्यातील एक खासदार आणि तिन्ही आमदार हिंदुत्ववादी विचाराचे आहेत. अन्यथा वक्फ बोर्ड दावा केलेली जागा एवढ्यात देऊन टाकली असती. तसेच या यादीच्या पलीकडे त्यांनी काय मस्ती केली आहे का, तेही आम्ही तपासणार आहोत. नागरिकांनी याबद्दलची सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे. हे मोठे षडयंत्र आहे, यामधून हिंदू समाजाला आपल्या देशातून कमी कसं करता येईल याचा प्रयत्न आहे. आमचं केंद्र सरकार असेपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांना शब्द देतो एक इंचही जागा वक्फ बोर्डला देणार नाही. असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.  


देवांकडे हे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत असतील तर... 


वक्फ बोर्डने आपल्या देवस्थानच्या जागेवर दावा ठोकण्याची हिंमत केली असेल तर सिंधुदुर्गातील हिंदू समाजाने यांचा डाव मोडून काढण्याची हिंमत केली पाहिजे. आज आपल्या देवांकडे हे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत असतील तर उद्या आपल्या राहत्या घरांना देखील ही लोक सोडणार नाहीत. त्यामुळे या सर्व बाबींचा अभ्यास करून मी ही प्रशासनशी बोलणार आहे. केंद्र सरकारने वक्फ बोर्ड कायद्यामध्ये तरतुदी सुचवल्या आहेत. ही यांची मुजोरी मोडून काढण्याचे प्रयत्न करणार. देशात रेल्वे, डिफेन्सनंतर वक्फ बोर्डकडे सर्वात जास्त जमिनीचा ताबा केला आहे. 


कुठलंही इस्लामिक आक्रमण सहन करणार नाही.


आज आपले एक एक देवस्थानावर ताबा ठोकण्याचा दावा ते करत असून उद्या आंगणेवाडी देवस्थान, कुणकेश्वर देवस्थान, रामेश्वर देवस्थानवर देखील दावा ठोकू शकतात. आपल्या देशात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असल्यामुळे आम्ही जागृत असून ही लोक आता तेवढी हिंमत करू शकणार नाहीत. आम्ही असं कुठलंही इस्लामिक आक्रमण सहन करणार नाही. 


हे ही वाचा