Nilesh Lanke: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटलेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही संतोष देशमुख हत्तीवरून राष्ट्रवादीच्या आमदारांनी प्रकरण लावून धरलं. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. आज शरद पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांच्यासोबत निलेश लंके बजरंग सोनावणे आणि राजेश टोपे ही उपस्थित होते. संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्व घटनाक्रम कुटुंबीयांकडून समजून घेतला तेव्हा शरद पवारांसमोर गावकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान या घटनेच्या मुळाशी जाऊन कोणाच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी सुरू आहेत याची उकल झाली पाहिजे असं खासदार निलेश लंके म्हणाले.
बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण तापलंय. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधीमंडळात या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात येत आहे.
काय म्हणाले निलेश लंके?
आपल्या गावचा आधारवड म्हणून ज्यांनी गेली पंधरा वर्षे काम केलं, त्या संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या परिसरासह राज्यालाही हृदयाला छेद करणारी घटना आहे. ही घटना घडली त्यावेळेस बाप्पा आणि मी दिल्लीमध्ये होतो. बाप्पांना मी रात्रभर अक्षरशः यायला फोन करायला लावले. आम्हाला किती टक्के रिस्पॉन्स आला किती टक्के नाही आला ते आम्ही नंतर संसदेत सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय गृहमंत्र्यांनासुद्धा आम्ही भेटलो. त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी ज्या घटनेमागे आरोपी आहेत आणि त्या आरोपींच्या पाठीशी कोण आहे आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी चालू आहे याची उकल झाली पाहिजे आणि खऱ्या आरोपींना सजा झाली पाहिजे. आम्ही या परिवाराला एक सांगू इच्छितो की पवार साहेबांनी आम्ही सर्वजण या परिवाराच्या पाठीशी आहोत. या घटनेचा पूर्णपणे तपास लागत नाही तोपर्यंत आम्ही या परिवाराच्या पाठीशी आहोत. असे निलेश लंके म्हणाले..
हेही वाचा: