Nilesh Lanke on Majha Katta : "राजकारणात शब्दाला किंमत असले, तु्म्ही काही केलं नाही तरी चालेल पण शब्द पाळा. शब्द पाळल्यानंतर लोक विश्वास ठेवतात. 2019 नंतर अडीच वर्षांनी महायुती सत्तेत आली. आम्ही महाविकास आघाडीत होतो. त्यावेळेस जिल्ह्यात वातावरण निर्मिती झाली. निलेश लंके विखे कुटुंबियांना टफ देऊ शकतो. महाविकास आघाडीचे नेते उमेदवाराच्या शोधात होते, तेव्हा रिपोर्टिंग झालं की, निलेश लंके यांच्याविरोधात चांगलं लढू शकतो. त्यावेळी अजितदादा आणि जयंत पाटील मला म्हणाले तुला तयारी करावी लागेल. तेव्हा मी नकार दिला. त्यानंतर जयंत पाटील 2-3 वेळेस म्हणाले तुलाच लढावी लागेल. त्यानंतर मला एक दिवस पवार साहेबांनी बारामतीला बोलावलं. ते म्हणाले तुला निवडणूक लढावी लागेल. एका बाजूला मोठी परंपरा आणि एका बाजूला फाटका माणूस अशी निवडणूक करायची आहे, असं मला पवार साहेब म्हणाले. मी म्हणालो नको. साहेब म्हणाले माझ्यासाठी राजीनामा देतो तर माझ्यासाठीच लोकसभा लढवं" असं अहमदनगरचे खासदार निलेश लंके म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत होते.
दादांनी कामाच्या माध्यमातून ताकद दिली,पण साहेबांनी आम्हाला प्रेम दिलं
निलेश लंके म्हणाले, मी उद्दिष्ट ठेऊन मतदारसंघात फिरु लागलो. पण त्यानंतर महायुती झाली. त्यानंतरही मी मतदारसंघात फिरतच होतो. एक दिवस सुप्याला गेस्ट हाऊसला आलो होतो. तिथे काही बैठका होत्या. त्यावेळी अजितदादांचा फोन आला कुठे आहे? मी म्हणालो मतदारसंघात आहे. ते म्हणाले उद्या मुंबईत ये. मला वाटलं प्रदेशाध्यक्ष पदाचा विषय असेल. तिथे गेल्यानंतर मला भुजबळ साहेब दिसले. वळसे पाटील साहेब दिसले. प्रफुल्ल पटेल पण दिसले. त्यानंतर डायरेक्ट शपथविधी झाला आमच्या डोळ्यावर अंधारीच आली. मला अजित पवारांनी विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्यांच्यासोबत राहणे मला भाग होते. दादांनी कामाच्या माध्यमातून ताकद दिली. पण साहेबांनी आम्हाला प्रेम दिलं. साहेबांना सोडल्यामुळे भावना दाटल्या होत्या, मी राजीनामा लिहून ठेवला होता. काही जणांनी सांगितलं निर्णय घेऊ नको.
सर्व्हेवाल्याला फोन केला त्याने नेगेटिव्ह सांगितला
पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले, नंतरच्या काळात अंकुश काकडेंनी माझ्याशी संपर्क केला, शरद पवारांनी सांगितलं होतं. पण शेवट मी अजितदादांना सांगितलं. त्यांना म्हटलं मी लोकसभेची निवडणूक लढवतो. ते म्हणाले मी सर्व्हे करतो, सर्वेमध्ये तुझं नाव बसलं, तर मी जागा मागतो. ठीक आहे म्हटलं सर्व्हे करा. त्यांनी सर्व्हेवाल्याला फोन केला त्याने नेगेटिव्ह सांगितला. शेवटी मी शरद पवारांना शब्द दिला होता. मी दादांकडे थांबलो असतो तर विरोधकांनी संपवून टाकलं असतं. त्यानंतर अजितदादांन म्हटलं सांगतो. सांगतो म्हणजे राजकारणाची भाषा असते. सांगतो आणि पाहतो म्हटलं आणि निघून गेलो.
इतर महत्वाच्या बातम्या