Maharashtra News : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत, हे लवकरच कळेल. हे चार जूनला सिद्ध होणार आहे, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांचा प्रचंड ज्ञानी आहेत, मी त्यापुढे सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे कुठलं उत्तर न देणे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं आहे, असं म्हणत त्यांनी खासदार संजय राऊतांनाही लक्ष्य केलं आहे.


नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल


नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं आहे की, उद्धव ठाकरेंच्या मनात प्रचंड द्वेष आहे. त्या संतापाच्या भरात ते बोलत असतात. ते त्यांच्या मनात आहे, ते बोलत आहेत. जामिनावरील लोकांचं काय मत आहे. हे चार जूनला सिद्ध होणार आहे. कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत. राजकीय दृष्ट्या जनाधार संपला, एवढं मात्र उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल.


राहुल गांधी यांच्यावरही निशाणा


नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं आहे की, प्रत्येक पक्ष हे काम करतच असतात. राहुल गांधींनी त्यांनी केलेलं वचन, जाहीरनामे आणि निवेदन आणि मनमोहन सिंहाच्या काळातील निर्णयाचे कागद फाडून टाकले होते. तसे स्वतःच्या खासदारांचे निर्णय ते फाडून टाकणार नाही याचे उत्तर पहिले त्यांनी द्यावे. रश्मी बर्वे प्रकरणांमध्ये जे काही निर्णय घेतलेले आहे, त्याबद्दलची सहानुभूती मिळून उलट महिला मतदारांची लोकप्रतिनिधींची ही जबाबदारी आहे.


भावना गवळींच्या बाबतीत मुख्यमंत्री शब्द पाळतील


उमेदवारी गेल्यावर भावना गवळी यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. भावनाताईंचं कार्य दुर्लक्षित राहणार नाही आणि त्यांना सामावून घेऊ, असं मुख्यमंत्री यांनी सांगितलेल आहे. मुख्यमंत्री ते स्वतःचा शब्द लगेचच पाळतात. यावर लवकरच चांगल्या प्रकारे मार्ग निघू शकेल. भावनाताईंना सोबत घेऊनच पुढे जाणार आहोत. रवींद्र वायकर यांच्यासंदर्भात काही भाकीत करणे म्हणजे रस्त्यावर बसलेल्या ज्योतिषी प्रमाणे काही तरी सांगण्यासारखे आहे. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. शिंदे साहेब त्यावर निर्णय घेतील.


पंचनामे करण्यासाठी पाऊस थांबणं गरजेचं


दरम्यान, सध्या राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पाऊस थांबणं गरजेचं आहे. पाऊस थांबल्याशिवाय पंचनामे करणार कसे, किती नुकसान झाले याचा अंदाज घेण्यासाठी पाऊस थांबणे गरजेचे असतं, असं नीलम गोल्हे यांनी म्हटलं आहे. विदर्भात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. प्रचार सुरू होण्याअगोदर त्यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मदतीचे निर्देश दिलेले आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.