Naresh Mhaske : ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांची शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दीपक केसरकर हे शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आहेत. त्यांच्याशिवाय किरण पावसकर, शीतल म्हात्रे यांचीही प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यात आता नरेश म्हस्के यांचीही प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नरेश म्हस्के यांची सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदेंना साथ
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून सूरतची वाट धरली तेव्हा त्यांच्यासोबत अनेक आमदार गेले त्यांच्यासोबत अनेक आमदार गेले असले तरीही ठाण्यातून सगळ्यात आधी त्यांना आपला पाठींबा जाहीर करण्यात नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर ठाणे शिवसेनेतील मंडळींना शिंदे यांच्यासोबत आणण्यात देखील त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पडली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत होती, तेव्हा त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थनार्थ सभा आयोजित करण्यात आली होते. त्यावेळी तिथे नरेश म्हस्के त्यांच्यासोबत होते. यावेळी नरेश म्हस्के यांनी जाहीर भाषणात एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची ठाणे जिल्हाप्रमुख पदासह शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होताच त्यांनी नरेश म्हस्के यांची ठाणे जिल्हाप्रमुख पदी पुनर्नियुक्ती केली.त्यानंतर आता त्यांना प्रवक्तेपदही दिलं आहे.
ठाण्यातील आक्रमक चेहरा
दरम्यान नरेश म्हस्के हे शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ठाण्यात ओळखले जातात. नरेश म्हस्के हे ठाण्याचे महापौर होते. आपल्या महापौरपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेकदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा नवीन सरकारवर होत असलेली टीका पाहता म्हस्के यांना पुन्हा एकदा त्यांच भूमिकेत शिरुन विरोधकांना जशास तसं उत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
संबंधित बातमी