Maharashtra politics Crisis :  विधान परिषद निकाल (Vidhan Parishad Result) लागल्यानंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. भाजपने (BJP) पाच जागा जिंकत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धक्का दिला. तर शिवसेनेत (Shivsena) राजीनामा  नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्केंनी राजीनामा दिला आहे. 


राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फुट पडली आहे.  शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांनाच समर्थन असल्याचे जाहीर केले.  शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी ट्विट करत जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.  आपल्या ट्विटमध्ये म्हस्के म्हणाले, आमचा धर्म, जाक आणि गोत्र हे शिवसेना आहे. त्यामुळे आम्ही  शिवसैनिक होतो  आणि शिवसैनिक राहणार.  पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची 'राष्ट्रवादी' गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे.


 






ठाणे महापालिकेसह जिल्ह्यातील अनेक निवडणुकांमधील राजकीय समीकरणे जुळवून आणण्यासाठी जिल्हाप्रमुख आमदार  एकनाथ शिंदे यांना नरेश म्हस्के यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. आज ठाण्यात शिंदे समर्थकांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. ठाण्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ठाण्याच्या रस्त्यावर उतरलेले दिसले.    या शक्ती प्रदर्शनात ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्ते जमले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: