Sharad Pawar On BJP: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी विरोधी पक्षांना मतभेद बाजूला ठेवून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. आम आदमी पक्षासोबत (AAP) उभे नसल्याबद्दलही त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. दिल्ली मद्य धोरण 2021 मध्ये कथित अनियमिततेसाठी आप केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीला सामोरे जात आहे. दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यक विभाग कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले आहेत की, हे काँग्रेसचे कर्तव्य आहे. अरविंद केजरीवाल यांच्याशी तुमचे मतभेद असतील, पण आपली खरी लढत भाजपशी आहे. आपली लढाई जातीयवादी शक्तींशी आहे.


शरद पवार म्हणाले आहेत की, भाजपचे नेते सांगतात वेगळे आणि करतात वेगळे अशी स्थिती आहे. पूर्ण देशात काय स्थिती आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नव्हती पण शिवसेनेला एका गटाला सोबत घेवून सत्ता आणली. देशात 70 टक्के भाजपची सत्ता नाही. 2024 मध्ये देशाचा नकाशा बदलू शकतो. पण त्यासाठी मिळून लढण्याची गरज आहे. ते म्हणाले दिल्लीच्या नेत्यांना विरोधात कट रचला जात आहे. केंद्र सरकारची ताकत घेवून ईडी आणि सीबीआयचा वापर करीत आहे. भाजपला मदत होईल अशी कुठल्याही पक्षाने भूमिका घेवू नये.


शरद पवार पुढे म्हणाले की, मोदीचे स्वतंत्र दिनाचे भाषण महिला बाबत बोलताना मात्र दोन दिवसात गुजरात सरकार बिल्कीस बानो प्रकरणी काय भूमिका घेतली. हा महिलांचा सन्मान आहे का? अशा घटना झाल्यानंतर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवण्याची गरज आहे. अल्पसंख्यक समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सरकार बदललेले हा निर्णय देखील बदलला. ते म्हणाले, अल्पसंख्यक समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सरकार बदललेले हा निर्णय देखील बदलला. दुबळा गट असतो त्यांना आरक्षण आवश्यक असते. 


देशात सत्तेचा गैरवापर सुरू आहे : शरद पवार 


पवार म्हणाले की, राजकीय पक्ष आपल्या विरोधी पक्षाच्या विरोधात ईडी वापर करीत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात पाहिलं आरोपपत्र 100 कोटी त्यानंतर 4 कोटी आणि आता 1 कोटीचे आरोपपत्र दाखल करण्यात आलं. नवाब मलिक याचा काय गुन्हा होता ते राष्ट्रवादी प्रवक्ते होते. नवाब मलिक यांच्या विरोधात जे आरोप आहे असे कुठेल्ही आरोप नाही असे माहितीच्या अधिकार सांगितले. संजय राऊत हे लिहत होते, म्हणून त्यांच्याविरोधात ईडीचा वापर केला गेला.