Rohit Pawar : अनेकांना पक्षांसोबत येण्याची इच्छा असते. पण माझ्याकडे कोणतही पद नसल्याने मला निर्णय घेता येत नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केले. जयंत पाटील (Jayant Patil) चांगल काम करत आहेत. पण काही सेलममध्ये काम करण्याची गरज आहे. त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील असे रोहित पवार म्हणाले. पद असो किंवा नसो, मुद्दा महत्वाचा असेल तर त्यावर बोललं पाहिजे असंही ते म्हणाले.
शरद पवार यांनी काँग्रेसच्या सत्तेत सुप्रिया सुळेंना संधी न देता प्रफुल्ल पटेलांना संधी दिली
शरद पवार (Sharad Pawar) यांनी 2014 पर्यंत काँग्रेसच्या सत्तेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना संधी न देता प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना संधी दिल्याचे वक्तव्य आमदार रोहीत पवार यांनी केलं. दरम्यान, अजित पवारांचे नेते कुजबुज करत आहेत. दादांचा दुसऱ्यांवर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी घरातच त्यांनी खासदारकी दिल्याचे बोलले जात असल्याचे रोहित पावर म्हणाले. अजित पवार यांच कुटुंब वेगळ आहे आणि शरद पवार यांच कुटुंब वेगळं आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच लहानपणापासून जवळचे आहेत. त्या भावनिक आहेत. त्यामुळं भावनेच्या भरात त्या बोलून जातात असे रोहित पवार म्हणाले.
पक्षात कोणाला घ्यायचं याचा निर्णय वरिष्ठ घेतील
अजित पवार गटात अनेक गोष्टी नॅार्मल नाहीत. अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे रोहित पवार म्हणाले. अधिवेशन होऊ दे.. फंड मिळू दे… त्यानंतर अनेक आमदार निर्णय घेतील. खालच्या पातळीवर टीका केली नसेल आणि जे विरोधात फार बोलले नसतील त्यांच्याबाबत आम्ही विचार करु असेही रोहित पवार म्हणाले. कोणाला पक्षात घ्यायचं याचा निर्णय वरिष्ठ घेतील असेही रोहित पवार म्हणाले.
अधिवेशनात कर्जमाफीच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आवाज उठवू
यंदाच्या अधिवेशनात कर्जमाफीच्या मुद्यावर आम्ही भूमिका मांडू असे रोहित पवार म्हणाले. गुंतवणूक आणि भ्रष्टाचार यावर आवाज उठवू असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दादांपेक्षा प्रफुल्ल पटेल यांचे फोटो जास्त दिसतात असे रोहीत पवार म्हणाले. पक्षावर दादांपेक्षा पटेल यांची पकड मजबूत असल्याचे रोहीत पवार म्हणाले. पक्ष नेमका का वेगळा झाला याबाबत बोलताना रोहीत पवार म्हणाले की, पटेल यांचे गुजरातमार्गे मोदींशी काही संबंध असतील.
पद असो किंवा नसो, मुद्दा महत्वाचा असेल तर त्यावर बोललं पाहिजे
मी नाराज होऊन दरवाजा बंद करुन बसत नाही. मी कोणा एकावर टीका केली नाही. लोकांची भूमिका मी बोलून दाखवली आहे. अनेकांना पक्षांसोबत येण्याची इच्छा असते. पण माझ्याकडे कोणतही पद नसल्याने मला निर्णय घेता येत नाही असे रोहीत पवार म्हणाले. जयंत पाटील चांगल काम करत आहे. पण काही सेलममध्ये काम करण्याची गरज आहे. त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील असे रोहित पवार म्हणाले. पद असो किंवा नसो, मुद्दा महत्वाचा असेल तर त्यावर बोललं पाहिजे. आता NEET चा मुद्दा होता. त्यावर तातडीने बोलणं गरजेच होते. ते झालं नाही असे रोहीत पवार म्हणाले.
आमचे 85 आमदार निवडून आणण्याची इच्छा
लोकसभेत राष्ट्रवादीने मोठ मन दाखवून सेनेला जास्त जागा दिल्या आहेत. आता विधानसभेत मविआने राष्ट्रवादीला जास्त जागा द्याव्यात असे रोहीत पवार म्हणाले. आमचे 85 आमदार निवडून आणण्याची इच्छा आहे. त्यासाठी काम करु द्यावे. जागावाटपाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असे रोहीत पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Amol Mitkari : रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचंय, पण जयंत पाटील त्यांचा टप्प्यात कार्यक्रम करणार : अमोल मिटकरी