Maharashtra Politicis News : राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठं यळ मिळालं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन करणार आहे. मात्र, यामध्ये राज्याचा नवीन मुख्यमंत्री (Chief Minister) कोण होणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. सर्वच पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत आहे. यातच बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील  सिंदखेड राजा (Sindkhed Raja) मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे (MLA Manoj Kayande) यांनी अजित पवारांना पहिल्या अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री करावं अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेख केला आहे. 


राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक


विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार ते पाच दिवस उलटून गेले असतानाही अद्याप सरकार स्थापन तर दूरच पण मुख्यमंत्री कोण? अशी चर्चा सुरु आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा करुन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदार संघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनियुक्त आमदार मनोज कायंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझिर काझी यांनी शेकडो कार्यकर्त्यांना घेत सिंदखेड राजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळी राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक घातला. यावेळी त्यांनी पहिल्या अडीच वर्षासाठी अजित पवार यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू असतानाच आता या नवीन मागणीने चर्चेला उधाण आलं आहे.


तप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य : एकनाथ शिंदे


विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून जवळपास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती दिल्याची माहिती आहे. त्यातच, गेल्या दोन दिवसांपासून नाराज असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदासंदर्भात भाष्य केलं. महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढलो असून आमच्यात कुठलीही नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच, महायुती मजबूत असून जनतेनं जो जनादेश दिलाय तो लक्षात घेऊन आता आणखी खूप काम करायचंय, नापी है थोडी जमीन पुरा आसमान बाकी है.. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकप्रकारे मुख्यमंत्रीपदाच्या निरोपाचंच भाषण केल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Ekanath Shinde : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा