Jalgaon News : राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवरुन पायउतार झाल्यानंतर जळगावमध्ये (Jalgaon) भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. संजय राऊत यांच्यानंतर पुढचा नंबर हा एकनाथ खडसे यांचा असणार आहे, असा दावाच महाजनांनी केला होता. आता यावर एकनाथ खडसे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. कोणी म्हणते नाथाभाऊ तुरुंगात जाईल. जायचंय तुरुंगात जाईन. मात्र माझं एक वाक्य लक्षात ठेवा, 'हम तो डूबेंगे सनम, लेकिन तुमको भी ले डूबेंगे', असं म्हणत खडसे यांनी गिरीश महाजन यांचं नाव न घेता कडक इशारा दिला.


ईडी नावाचा प्रकार आता घरोघरी पोहोचला आहे. माझ्यामागे ईडी लागली, सीबीआय लागली, अँटी करप्शन ब्युरो लागलं. असेल नसेल ते लागलं, काय झालं काहीच नाही. विरोधकांना उठलं की फक्त नाथाभाऊच दिसतो. कोणी म्हणते नाथाभाऊ तुरुंगात जाईल, जायचंय तर तुरुंगात जाईन. मात्र माझं एक वाक्य लक्षात ठेवा, 'हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी ले डूबेंगे' असं म्हणत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर जोरदार पलटवार केला.


गिरीश महाजन काय म्हणाले होते?
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे, अशी असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. भोसरी प्रकरणात प्रचंड अनियमितता आहे, त्यामुळे खडसेंची जेलवारी अटळ आहे. भोसरी प्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरी हे जेलमध्ये आहेत, त्यांना जामीन मिळत नाही. भोसरी गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने कोणतीही ॲक्शन घेऊ नये, असे सूचित केले आहे. ते हटल्यानंतर लगेचच एकनाथ खडसेंना जावयासोबत जेलमध्ये जावं लागेल, असे सूतोवाच गिरीश महाजन यांनी केले होतं.


राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या भोसरी प्रकरणाची पुन्हा एकदा लाचलुचपत विभागाकडून पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. याच प्रकरणावर गिरीश महाजन यांनी भाष्य केलं होतं.