मुंबई :नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना महिला आयोग अध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावं लागलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला होता. एकीकडे राज्यात अशोक खरात (Ashok Kharat) व्हिडिओ आणि महिला लैंगिक अत्याचार प्रकरण गाजत असतानाच राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांचेही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे, मंत्री झिरवळ हे शासकीय निवासस्थानी दिसत असून हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावरही पक्षातून कारवाई होणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, राष्ट्रवादीने झिरवाळ यांना अभय दिलं आहे. 

Continues below advertisement

नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अभय देण्यात आलं असून कथित व्हिडीओ प्रकरणात नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. दरवेळी आरोप झाले की राजीनामा घ्यावा हे काही योग्य नाही, अशी पक्षातील वरिष्ठांची भूमिका आहे. त्यामुळे व्हिडीओ प्रकरणात नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्‍यांना आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. धनंजय मुंडे हे मंत्री पदावर असताना संतोष देशमुख प्रकरणात त्यांच्या निकटवर्तीयास अटक करण्यात आल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. तर, न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे.

झिरवाळ यांच्या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे

मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मला दूरध्वनीवरुन संपर्क केला, 3-4 व्हीडिओ जोडत चुकीच्या पद्धतीने समोर आणले आहेत. त्यामुळे, यासंदर्भात त्यांना सांगितलं आहे, तक्रार करा. व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झिरवाळांना सांगितले. आम्ही आणि सुनेत्रा पवार त्यांच्यासंदर्भात कारवाई करू, मात्र सत्यता पडताळली जाईल. झिरवाळ यांचे व्हीडिओ गंभीर, सत्यता पडताळून पाहिली पाहिजे, असेही फडणवीसांनी म्हटले.  

Continues below advertisement

खरात व्हिडिओ प्रकरणावरुन इशारा

देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणावरूनही भूमिका स्पष्ट केली. पहिल्यांदा त्यांचे फोटो व्हिडिओ येतात, त्यावरुन गोष्टी डिटरमिन करता येणार नाही. सहभाग असेल तर कारवाई होईल, कोणालाच सोडण्याचे कारण नाही. येत्या काळात आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे, आर्थिक फसवणूक झाली म्हणून लोकं पुढे येत आहेत. ह्या प्रकरणात दुर्दैवी महिला व्हीक्टिम आहेत, त्यांचे व्हीडिओ सोशल मीडिया साईटवर टाकले आहेत. जर कोणी व्हिडिओ अपलोड केले असतील तर कारवाई होईल. यातील गोपनीयता भंग करण्यात येत आहेत, त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. 

हेही वाचा

मुंबईचं आकर्षण 'वनराणी' पुन्हा बंद, तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा अखंडीत; पर्यंटकांकडून संताप, नाराजी