मुंबईचं आकर्षण 'वनराणी' पुन्हा बंद, तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा अखंडीत; पर्यंटकांकडून संताप, नाराजी
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांसाठी पर्वणी आणि चिमुकल्याचं आकर्षण असलेली वनराणी, टॉय ट्रेन पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे.

Vanrani toy train again close tourism
1/8
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांसाठी पर्वणी आणि चिमुकल्याचं आकर्षण असलेली वनराणी, टॉय ट्रेन पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे.
2/8
गुजरातून काही महिन्यांपूर्वी आलेली ही नवीन ट्रेन देखील बंद झाल्यामुळे पर्यटकांमध्ये प्रशासना विरोधात मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.
3/8
गुजरात अहमदाबाद मधून ही हिरव्या रंगाची नवीन ट्रेन मागवण्यात आली होती, नवीन ट्रेन बंद पडल्यामुळे ट्रेन बनवणाऱ्या कंपनीचा कामावर देखील प्रश्न चिन्ह निर्माण केली जात आहे
4/8
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वनराणी’ मिनी टॉय ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण देण्यात आलंय. इंजिनमध्ये समस्या निर्माण झाल्याने सेवा तीन दिवसांपासून तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
5/8
ट्रेनमध्ये बिघाड झाल्याने वनराणीची सफर करण्यासाठी उत्साही असलेल्या आणि दूरदूरहून आलेल्या पर्यटकांना परत जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
6/8
दरम्यान, लवकरच वनराणी ट्रेनची सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती उद्यान प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
7/8
दरम्यान, यापूर्वी मे 2021 मध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे वनराणी सेवा बंद झाली होती. त्यानंतर, 6 जानेवारी 2026 पासून पुन्हा पर्यटकांसाठी ही ट्रेन सुरू करण्यात आली.
8/8
14 मार्च रोजी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करुन पर्यटकांसाठी ही ट्रेन सुरू करण्यात आली होती.
Published at : 27 Mar 2026 02:32 PM (IST)