नाशिक:  भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याचे काळे कारनामे बाहेर आल्यानंतर तो कॅप्टन  (Ashok Kharat)  कसा झाला याची देखील चर्चा सुरू आहे. मात्र कॅप्टन होण्याआधी त्याच्या जन्म गावात आणि परिसरात त्याची ओळख होती हाँगकाँग म्हणून. नेमकं हाँगकाँग का म्हणायचे आणि तो शालेय जीवनात कसा होता हे उलगडले त्याच्या वर्ग मित्रांनी. अशोक खरात  (Ashok Kharat)  शाळेतही शिक्षकांना दम द्यायचा. तब्येत जाड असल्याने दादागिरी करायचा. एवढेच नव्हे तर शिक्षकांच्या अंगावर देखील धावून जायचा. खरात LE या नावाने आम्ही त्याला बोलवायचं आणि तो देखील त्याच पद्धतीने आम्हाला आडनाव आणि शॉर्ट नावाने बोलवायचा. शाळेत चार पोरं जरी कबड्डी खेळताना लटकले तरी त्यांना ओढून घेऊन जायचा. (Ashok Kharat) 

Continues below advertisement

आधी तो आमच्या पुढच्या वर्गात होता. मात्र नापास होतो तो दहावीला आमच्याबरोबर आला. दहावीनंतर आमचा संपर्क आला नाही. मात्र तो नियमित होता असा ऐकायचो. शिक्षण 83 नंतर काही वर्षात तो इकडे नव्हता मात्र त्यानंतर आज त्याला कॅप्टन म्हणतात मात्र त्यावेळी त्याला हाँगकाँग म्हणून ओळखायचे. आज जे काही त्याची कृत्य समोर आले हे पाहिल्यावर आमचा वर्गमित्र म्हणून घेण्याची आम्हाला लाज वाटते. आज मित्र म्हणून म्हणून घेण्याच्या लायकीचा तो नाही.

अशोक खरात  (Ashok Kharat) 'कॅप्टन' म्हणून ओळखला जाण्यापूर्वी त्याच्या जन्मगावात त्याला 'हाँगकाँग' या नावाने ओळखले जात असे. तो स्वतः देखील लोकांना आपण हाँगकाँग किंवा इतर विविध देशांमध्ये होतो, असे सांगत फिरायचा. शाळेत असताना अशोक खरात अभ्यासात फारसा हुशार नव्हता. त्याच्या वर्गमित्रांच्या सांगण्यानुसार, तो शाळेतही शिक्षकांना दम द्यायचा आणि त्यांच्या अंगावर धावून जायचा. अंगाने जाड असल्याने तो दादागिरी करायचा आणि कोणालाही जास्त बोलू न देता गप्प करायचा.

Continues below advertisement

गरिबी आणि सुरुवातीचे दिवस

सुरुवातीच्या काळात त्याची परिस्थिती अत्यंत बेताची (गरिबीची) होती. तो घरून अंडी आणून शाळेत विकण्याचे काम करायचा. त्याकाळी त्याचे राहणीमान आणि कपडे अत्यंत साधे होते.

वर्गमित्रांची प्रतिक्रिया

खरातच्या या अघोरी कृत्यांमुळे आणि बदनामीमुळे आता त्याला आपला 'वर्गमित्र' म्हणण्याची देखील लाज वाटते, अशी भावना त्याच्या जुन्या मित्रांनी व्यक्त केली आहे. तो भविष्यात अशा प्रकारची कृत्ये करेल, अशी स्वप्नातही कल्पना केली नव्हती, असेही त्याच्या एका मित्राने सांगितले आहे.