NCP Ajit Pawar and Eknath Shinde, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपल्या पक्षातील नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. शिवाय महामंडळांवर नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. टप्प्या टप्प्याने एकनाथ शिंदेकडून देण्यात येतं असलेल्या नियुक्त्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी सूर पाहायला मिळतोय. 


अजित पवारांची आमदारांची बुधवारी रात्री मुंबईत बैठक


शिंदेंनी स्वपक्षीयांच्या नियुक्त्या केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बुधवारी रात्री मुंबईत बैठक बोलावली. अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी बुधवारी (दि.18) रात्री साडेसात वाजता आमदारांची बैठक पार पडणार आहे. 


आमदारांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर


सध्या सत्तेत केवळ एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महामंडळ तसेच मंत्रिपदाचे वाटप होत असल्यामुळे आमदारांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. बुधवारी होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. 


मागील काही दिवसात देण्यात आलेल्या नियुक्त्या


1) प्रदूषण नियंत्रण बोर्ड अध्यक्ष -  सिद्धेश कदम 


2) सिद्धिविनायक न्यासा प्रमुख - सदा सरवणकर


3) निलम गोऱ्हे - कॅबिनेट पदाचा दर्जा 


4) माजी खासदार हेमंत पाटील - हळद संशोधन केंद्र प्रमूख पदी वर्णी 


5) माजी खासदार आनंदराव अडसूळ- अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती


6) आदिवासी भागात कुपोषण रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीचे प्रमूख डॉ. दीपक सावंत यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा 


7) आमदार महेश शिंदे - उपाध्यक्ष, कृष्णा खोरे विकास महामंडळ, कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा 


8) संजय शिरसाट - सिडको अध्यक्ष


शिवसेनेचे  माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची अनुसूचित जाती जमातीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या आयोगाच्या अध्यक्षपदी अडसूळ यांची दीड वर्षांकरीता नेमणुक करण्यात आली आहे. आनंदराव अडसूळ यांनी काही दिवसांपूर्वी मला राज्यपाल पद दिलं जाईल, असा दावा केला होता. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला महामंडळे नाहीत? 


एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत टप्प्याटप्प्याने महामंडळाचे वाटप 


आमदार सदा सरवणकर सिद्धिविनायक न्यासाचे ट्रस्टी, माजी खासदार हेमंत पाटील हळद संशोधन केंद्राचे प्रमुख तर आता आमदार संजय शिरसाट सिडको महामंडळाचे अध्यक्ष 


राष्ट्रवादीच्या वाट्याला काहीच न आल्याची राजकीय वर्तुळातील चर्चेबाबत बोलताना तटकरे यांनी राष्ट्रवादीचा योग्य सन्मान होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला 


आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला देखील महामंडळ येणार असल्याची सुनील तटकरे यांची एबीपी माझाला माहिती


इतर महत्वाच्या बातम्या 


Nashik Hit and Run Case : परदेशी पर्यटकांकडून हिट अँड रन, दुचाकी चालकाचा मृत्यू, कायदेशीर अडचणीमुळे आरोपींना ताब्यात घेता येईना, पोलिसांचा हॉटेल बाहेर बंदोबस्त