Navaratri 2022: गणेशोत्सवानंतर आता अवघ्या काही दिवसांवर नवरात्रीचा उत्सव येऊन ठेपला आहे. अशातच गेल्या दोन वर्षात कोरोना निर्बंधानात (Corona Restrictions In Maharashtra) हा ऊत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र आता कोरोनामुळे घातलेले निर्बंध नवरात्रीच्या काळात मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेचे  (Shiv Sena) आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. गुजरात, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये नऊ दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत गरबा-दांडिया खेळण्याची परवानगी आहे. हे पाहता महाराष्ट्रातही तशी परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सुर्वे यांनी आपल्या पत्रात केली आहे. 


सुर्वे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहेत की, कोरोना संकटाच्या दोन वर्षानंतर नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. हे पाहता महाराष्ट्र सरकारने या उत्सवाच्या वेळेबाबत आणि इतर नियमांबाबतचे सर्व निर्बंध हटवावेत. यासोबतच शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी गरबा आणि दांडियाच्या वेळा रात्री 12 वाजेपर्यंत वाढवण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.


सध्या महाराष्ट्रात नवरात्रोत्सव (Navratri) साजरा करण्याची आणि नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रात्री12 वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवानगी आहे. याशिवाय उर्वरित आठ दिवस रात्री 10 वाजेपर्यंत उत्सव साजरा करण्याची परवानगी आहे. हे पाहता या वेळी दररोज रात्री 12 वाजेपर्यंत गरबा खेळण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली.


26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे


यंदा नवरात्रोत्सव 26 सप्टेंबरपासून सुरू होत असून 5 ऑक्टोबरला दसरा आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. ज्यामध्ये दुर्गेच्या दिव्य रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते. सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाची कमी प्रकरणे समोर येत आहेत. हे पाहता राज्य सरकार गणेशोत्सवाप्रमाणेच (Ganesh Utsav 2022) नवरात्रीत कोरोना निर्बंध मागे घेऊ शकते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


येत्या काळात प्रत्येक होर्डींगवर 'क्यूआर कोड' बंधनकारक होण्याची चिन्ह, हायकोर्ट लवकरच याबाबतचे आदेश जारी करणार
Pune News: पुणेकरांनो तुम्ही भेसळयुक्त पनीर खात तर नाही ना? वानवडीतील पनीर कारखान्यावर मोठी कारवाई; तब्बल 799 किलो पनीर जप्त