Shahajibapu Patil On Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करताना आमदार शहाजीबापू पाटील हे भावुक झाले आहेत. पैठण येथील सभेत बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, राज्याचा कारभार करत असतानाही माझी आई आणि बहिणीची काळजी करतो. लहानपणापासून ते रात्रंदिवस मेहनत करत आहेत, असं म्हणता ते भावुक झाले आहेत.    


शहाजीबापू पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे हे शेतीत काबाड कष्ट करून रिक्षा चालवून पुढे आलेले नेतृत्व आहे. मला गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी 400 कोटी निधी दिला आहे. ते म्हणाले, ''माझ्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी टीका केली. झाडी डोंगर वर, मात्र बाळासाहेबांची लेकरं म्हणून सहन केल, जाऊद्या म्हटलं.'' तत्पूर्वी बोलताना ते म्हणाले आहेत की, भुमरे यांनी मंचावर कोपऱ्यात दोन रिकाम्या खुर्च्या खुर्च्या ठेवायला हव्या होत्या. खैरे आणि अंबादास दानवेना ही गर्दी दाखवण्यासाठी. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचययावर टीका करताना ते म्हणाले आहेत की, ''आमचा नेता दनगट आणि कणखर, आता खासदार होण्याचे विसरून जा.'' 


शहाजीबापू पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष शिवसेना युती आणि हिंदुत्वासाठी आम्ही मतांची भीक मागितली. पण काय झाले कळणे नाही. आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या हॉटेलमध्ये पळवून लावलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पंगतीला नेहून आम्हाला बसवलं. तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आम्ही आनंदाने स्वीकारले. मात्र अडीच वर्षात काय झालं आमचं, शिवसेनेच्या आमदारांच्या पत्रावर काम झालं नाही. ते म्हणाले, आम्ही सुरत वरून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करूनच घरी गेलो. एकनाथ शिंदे-फडणवीस मन आणि विचार जुळलेली नेतृत्व आहेत.


अंगणवाडी सेविकावरील पत्र खोटे : संदीपान भुमरे


गेल्यावेळी रिकाम्या खुर्च्यांना मार्गदर्शन करण्याची वेळ मंत्री संदीपान भुमरेंवर ओढावली होती तशी फजिती आता होऊ नये. म्हणूनच अंगणवाडी सेविकांना सभेसाठी सक्ती केली असावी, असा टोला विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंनी केली आहे. यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, मला पैसे देऊन माणसे आणण्याची गरज नाही. यांना पैसे देऊन आणायची सवय खैरे आणि अंबादास दानवे यांची आहे. यावेळी बोलताना अंगणवाडी सेविकावरील पत्र खोटे असल्याचं ते म्हणाले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Supriya Sule In Purandar: महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री हवेत! एक गणपती मंडळं फिरतील तर दुसरे जनतेला न्याय देतील; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Aurangabad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेल्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडलं, औरंगाबादमधील बिडकीन येथील प्रकार