Nashik Election 2026: राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. नाशिक, मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये (Nashik Election 2026) देखील घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत असून नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची (NCP Ajit Pawar Faction) हतबलता दिसून आली आहे. युतीच्या चर्चेसाठी मंत्री गिरीश महाजनांकडे (Girish Mahajan) अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अक्षरशः विनवणी केल्याचे पाहायला मिळाले.  

Continues below advertisement

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकच्या हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीला भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मनपा निवडणुकीतील उमेदवारी संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

Nashik Election 2026: नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची हतबलता

त्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करण्यासाठी दाखल झाले. मात्र,  मंत्री नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ हे गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी वेटिंगवर असल्याचे दिसून आले. तर चर्चेसाठी पाच मिनिटं तरी वेळ द्या, अशी विनवणी आमदार हिरामण खोसकर आणि नरहरी झिरवाळ यांच्याकडून गिरीश महाजनांना करण्यात आली. परंतु, महायुतीची चर्चा न करताच गिरीश महाजन मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाशिकमध्ये हतबलता पाहायला मिळाली. 

Continues below advertisement

Nashik Election 2026: नाशिकमध्ये मनसे-ठाकरेंची शिवसेना एकत्र निवडणूक लढणार

दरम्यान,  नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत. लवकरच नाशिकमधील मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा होणार आहे. नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयात मनसे पदाधिकारी आणि ठाकरे यांच्या शिवसेनेची बैठक आज पार पडली. नाशिक महानगरपालिकेच्या जागा वाटपा संदर्भात ही बैठक झाली. यावेळी ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी व मनसेचे नेते दिनकर पाटील हे उपस्थित होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ajit Pawar & Sharad Pawar: मोठी बातमी : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत, दादा-ताईंचं बोलणं झालंय, सगळेजण घड्याळावर लढणार, अजितदादांच्या बड्या नेत्याचा मोठा दावा

Manikrao Kokate : मोठी बातमी : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेलाही स्थगिती, सुप्रीम कोर्टाकडून सर्वोच्च न्याय!