Sangamner Nagar Parishad Election: गेल्या चार दशकांतील सर्वात चुरशीची, प्रतिष्ठेची आणि राज्यभर लक्ष वेधून घेणारी संगमनेर नगरपरिषद निवडणूक (Sangamner Nagar Parishad Election) अखेर तांबे–थोरात परिवाराने ऐतिहासिक बहुमताने जिंकली. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत संगमनेर सेवा समितीच्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे यांनी विरोधकांवर मोठी मात करत  16 हजार 408 मतांनी दणदणीत विजय मिळवला. नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही संगमनेर सेवा समितीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. एकूण 30 जागांपैकी तब्बल 27 जागांवर सेवा समितीचे उमेदवार विजयी झाले. यानंतर विजयी सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी जोरदार भाषण केले.  

Continues below advertisement

बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेरमध्ये आपण सर्वांनी अभूतपूर्व विजय मिळवला. मी सर्वांचे अभिनंदन करतो, असे त्यांनी सुरुवातीला म्हटले. ते पुढे म्हणाले की, शहरात फ्लेक्सबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील. सुंदर शहर, स्वच्छ शहर याकडे आपल्याला लक्ष द्यायचे आहे. येथील बस स्थानक देखील स्वच्छ ठेवावे लागले. जो विश्वास टाकला, त्याला सार्थ करण्याचे काम आपण करायचे आहे. अंमली पदार्थ येतात कसे? हे पोलिसांनी तपासावे, येथे गुंडगिरी चालली आहे. ते बंदोबस्त करू म्हणतात, आता त्यांचाच बंदोबस्त करावा लागेल. बेकायदेशीर टोल नाके बंद करावे लागतील, असा पुढचा प्लॅन त्यांनी मैथिली तांबेंना सांगितला.  

Continues below advertisement

Balasaheb Thorat: दादागिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा लागेल

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, निळवंडे धरण करण्यात माझा मोठा वाटा आहे. आम्ही केल्याचा आम्हाला अभिमान आहे. नाशिक - पुणे रेल्वे संगमनेरमधूनच न्यावी. अकोलेत पण रेल्वे हवी.  संगमनेरची रेल्वे कोणी घालवली? कोणाच्या हातातील बाहूलं होऊन संगमनेरच नुकसान करणाऱ्यांचा बंदोबस्त करा. सर्वांना चांगले काम करायचे आहे. शहरासोबत तालुका दुरुस्त करावा लागेल. दादागिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा लागेल. ज्यांनी पाठिंबा दिला, त्या पक्ष आणि संघटनांचे आभार, असे त्यांनी म्हटले. 

Sangamner Election Result: थोरात-तांबेंनी पराभवाचा वचपा काढला

दरम्यान, संगमनेरमध्ये महायुतीकडून सुवर्णा खताळ यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी स्वतः लक्ष घालून प्रचाराची धुरा सांभाळली होती. मात्र, संगमनेरच्या मतदारांनी या सर्व समीकरणांना फोडून बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा ठाम विश्वास दाखवला. डॉ. मैथिली तांबे यांनी दणदणीत विजय मिळवला. नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही संगमनेर सेवा समितीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. एकूण 30 जागांपैकी तब्बल 27 जागांवर सेवा समितीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

आणखी वाचा

Manikrao Kokate: आमदारकी वाचली पण माणिकराव कोकाटे पुन्हा मंत्री होणार नाहीत, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?