उद्धव ठाकरे फुसका बार, अडीच वर्षात दोनच दिवस मंत्रालयात गेले; नारायण राणेंची टीका

Narayan Rane On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणेंनी प्रहार करत पुसका बार, कमिशन खाणारा, हिंदुत्वाशी गद्दारी करणारा, अशी सडकून टीका केली आहे.

Continues below advertisement

सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फुसका बार म्हणत भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणेंनी प्रहार करत पुसका बार, दहशताद्यांना सुपारी देणारा, कमिशन खाणारा, हिंदुत्वाशी गद्दारी करणारा, अशी सडकून टीका केली आहे. एवढंच नाही तर शरद पवारांनी शिवसेना संपवल्याची टीकाही राणेंनी केली आहे. 

Continues below advertisement

उद्धव ठाकरे फुसका बार

उद्धव ठाकरे यांना काय कळतं, उद्धव ठाकरे म्हणजे फुसका बार, अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात गेले. मातोश्रीच्या बाहेर पडले नाहीत. जो माणूस मंत्रालयात जाऊ शकत नाही, त्यांनी लोकांच्या हिताचं कोणतं काम केलं, असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला आहे. विद्यमान खासदार विनायक राऊत चालू पाच वर्षात 57 टक्के खासदार निधी खर्च करू शकले नाहीत, असं म्हणत राणेंनी विनायक राऊतांवरही टीका केली आहे.

कोरोना काळात 15 टक्के कमिशन खाल्लं

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी भाजप नेते नारायण राणे तिकीटासाठी इच्छुक आहेत. यामुळे राणेंनी महाविकास आघाडीला लक्ष केलं आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, पाच किलो कुणाला धान्य दिलं का? उलट केंद्र सरकारकडून कोरोना काळात औषधासाठी पैसे आले त्यात 15 टक्के कमिशन खाल्लं, त्याची चौकशी सुरू आहे. याला जवळ घेऊ नये, मी नाय सोडणार, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला आहे.

उद्धव ठाकरे यांना चागलं बोलता येत नाही

गद्दारांचे मालक सध्या महाराष्ट्रात फिरतायेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केली होती, यावर नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना चागलं बोलता येत नाही. राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले, पण उद्धव ठाकरे यांच्यासारखी भाषा कोणी बोललं नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व, मराठी माणूस यांच्याशी गद्दारी केव्हाही केली नाही, असंही राणेंना म्हटलं आहे.

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola