Jayant Patil Resign : शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटलांनी दिला कानमंत्र
प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला चांगला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर असणार आहे. पक्षाच्या प्रत्येक सेलची बैठक घेऊन प्रत्येकाशी फेस टू फेस चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्षमता वाढवून नवीन लोकांना संधी देऊन प्रत्येक सेल चांगल्याप्रकारे उभा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांचे नियोजन आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी २६३३ दिवस प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले. पदावरून बाजूला होण्याची ही योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले. "माझी कोणतीही संघटना नाही, वेगळा गट नाही असं पाप कधी केलं नाही," असे त्यांनी भाषणात सांगितले. तसेच, "दोन खासदार असलेला भाजपा मोठा होऊ शकतो, तर दहा आमदार असलेला आपला पक्ष मोठा का होऊ शकत नाही?" असा प्रश्न विचारत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. पक्षाचे मुख्य सचिव म्हणून आमदार रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.