जालना: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात राजकीय घटनांना वेग येत असून विधानसभेसाठी इच्छूक उमेदवारांनी तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. माजी खासदार भास्करराव खतगावकर यांची सून मीनल खतगावकर यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची आंतरवली सराटी येथे भेट घेतली आहे. त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत त्यांच्या तब्येतीचीदेखील विचारपूस केल्याचं कळतंय. थेट मागणी नसली तरी  जरांगेंनी पाठींबा द्यावा अशी त्यांची इच्छा दिसत असल्याची चर्चा आहे.


नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघातून डॉ मीनल खतगावकर इच्छूक आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विधानसभेला तिकीट दिले नाही तर भाजपला बंडाचा इशारा दिला होता. आता त्यांच्या आणि मनोज जरांगेंच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


मीनल खतगावकर मनोज जरांगेंच्या भेटीला


नांदेडचे माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सुन डॉ  मीनल खतगावकर यांनी आज अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. डॉ मिनल खतगावकर ह्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.  डॉक्टर मीनल खतगावकर यांनी मनोज जरांगे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या भूमिकेला आपलं समर्थन असल्याचं सांगत आपला आपण त्यांच्या तब्येतीची देखील विचारपूस केल्याचं दिसतंय.


नायगाव मतदारसंघावर काँग्रेसचा दावा


खासदार अशोक चव्हाणांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर लोकसभेत नांदेडमध्ये भाजपला मोठा फटका बसला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जिल्ह्याचे राजकीय गणित कसे राहणार? नांदेड विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाला तिकिट मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस दावा करत असून भाजपकडून नक्की कोणाला उमेदवारी द्यायची याकडे सर्वांचे लक्ष आहे. मीनल खतगावकरांच्या प्रयत्नांना किती यश येते हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.


अपक्ष म्हणून लढणार मीनल खतगावकर?


आम्ही अपक्ष म्हणून तयारी केली असल्याचे त्या वारंवार सांगत असून भाजपकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याची त्यांनी तयारी दर्शवली होती.भाजपने तिकीट दिलं नाही तरी लढणार का असा प्रश्न विचारला असता बिलकुल असे उत्तर त्यांनी दिलं. त्या म्हणाल्या होत्या.दोन वेळा आम्हाला माघार घ्यावी लागली. 2019 आणि 2024 च्या लोकसभेत पक्षादेश आम्ही मान्य केला. परंतु आता जर पक्षाकडून संधी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका आहे. आणि ती भूमिका मला मान्य आहे. असा बंडाचा इशाराही त्यांनी पक्षाला दिला होता.


अमित शहांची काही महिन्यांपूर्वी घेतली होती भेट


मीनल खतगावकर यांनी अमित शाहांची काही महिन्यांपूर्वी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. नांदेड लोकसभेसाठी मीनल खतगावकर इच्छा दाखवली होती. आगामी काळात नांदेड लोकसभा मतदारसंघात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाच ठरतात. त्यामुळे या मतदारसंघात विद्यमान खासदार यांना उमेदवारी दिली जाणार की मीनल खतगावकर यांचा विचार केला जाणार हे पाहणं महत्त्वाच आहे.