Ashok Chavan: राज्यात सध्या भाजपचे जिल्हा अधिवेशन सुरु अशोक असून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भोकर मतदारसंघात अशोक चव्हाण (Ashok Chavan) चांगलेच ॲक्टीव्ह झालेले दिसतात. आमची लॉटरी लागली आम्ही गेलो तिकडं, असं म्हणत त्यांनी आमदार वसंत चव्हाणांना तिरकस टोला लगावलाय. लोकसभेत बोलणारी माणसं पाहिजेत, इथं इंग्रजीही आम्हाला येत नाही अन् हिंदीही बोलता येत नाही असं म्हणत त्यांनी वसंत चव्हाणांवर नाव न घेता तिरकस टोलेबाजी केली. अशी लॉटरी विधानसभेत लागू देऊ नका असं म्हणत त्यांनी हात जोडल


लोकसभेपूर्वी काँग्रेसला राम राम ठोकून भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांना नांदेडमध्ये मोठा फटका बसला. नायगावचे वसंतराव चव्हाण यांना पहिल्याच फटक्यात लोकसभा प्रयत्नात यश मिळाल्याने नांदेडमध्ये काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. दरम्यान, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता अशोक चव्हाण पुन्हा एकदा नांदेडमध्ये जोर लावताना दिसतायत.


काय म्हणाले अशोक चव्हाण?


लोकसभेत बोलणारी माणसं पाहिजेत. इथं इंग्रजीही आम्हाला येत नाही आणि हिंदीही येत नाही. आमची लॉटरी लागली आम्ही गेलो तिकडं असं म्हणत त्यांनी वसंत चव्हाणांना टोला लगावला. धड इंग्रजी येईना, धड हिंदी येईना.. मग इकडं बसलं काय आणि तिकडं बसलं काय सेमच झालं ना.. असं ते म्हणाले. याचा उपयोग काय ? असा सवाल करत आपले मुद्दे मांडता आले पाहिजे, मराठवाड्याचे प्रश्न सुटले पाहिजे. जो बोलेल त्याचा माल खपेल, जो बोलणार नाही त्याला कोणी विचारणार नाही, असं म्हणत अशी लॉटरी कुणाची लागू देऊ नका असं म्हणत चव्हाणांनी हात जोडले. 


सोशल मिडीयावर प्रचार चालतो


सध्या सोशल मिडीया प्रचाराचा केंद्रबिंदू झाला असून ९० टक्के लोक तिथं प्रचार करतात. सोशल मिडीयावर करमणूकीचा कार्यक्रम सुरु आहे. यावर आलेलं किती खरं आणि किती खोटं हे ठरवण्याची बुद्धी आपल्याकडं पाहिजे. नाहीतर हे सगळं बोगस असल्याचं ते म्हणाले.


भोकर मतदारसंघात श्रीजया चव्हाणांची मोर्चेबांधणी


नांदेडच्या भोकर मतदारसंघासाठी अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनी चांगली मोर्चेबांधणी सुरु केल्याचं दिसतंय. भोकरमधून श्रीजया उमेदवारी लढवण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लोकसभेत भाजपचा पराभव झाल्याने आता भोकर मतदारसंघात अशोक चव्हाण आता ॲक्टीव्ह झाले असून त्यांनी भोकर मतदारसंघ चांगला पिंजून काढला आहे आता चव्हाण यांचा विनंतीला भोकरवासी कसा मान देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.