Nana Patole on MCA Election, Mumbai : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबच्या अध्यक्षपदी निवड झालीये. त्यामुळे नाना पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणुकीत मैदानात उतरणार असल्याची चर्चा रंगली. दरम्यान या निवडणुकीबाबत नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे. "सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं सुरू आहे आणि मी महाराष्ट्राचा पदाधिकारी आहे. त्यामुळे अडचण काही नाही", अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. 


विलासराव देशमुख यांच्यापासून ही परंपरा सुरू आहे


नाना पटोले म्हणाले, काँग्रेस पक्षाचे 44 विभागीय सेल आहेत त्यांच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम आज होता.  कार्यकर्त्यांना शाबासकी देणे संघटनेचे काम आहे त्यामुळे या कार्यक्रमाचा आलेले आहे. विलासराव देशमुख यांच्यापासून ही परंपरा सुरू आहे, मी त्यांचा शिष्य आहे.  त्यामुळे मी माझ्या गुरूचे जे मार्गदर्शन आहे ते पुढे नेतो.  निवडणुकीबाबत सगळ्यांशी चर्चा सुरू आहे त्यानंतर निर्णय घेणार आहोत. 


महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारची तानाशाही आहे


विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबतही नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे. नाना पटोले, म्हणाले, विरोधी पक्ष नेत्यांना निलंबित केले जाते. ही महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारची तानाशाही आहे. ती आपल्याला पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांच्याबाबत नाना पटोले म्हणाले, भाजपला  सत्तेसाठी दाऊद ही चालतो. 


नाना पटोलेंना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मतदान करता येणार


नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड झालीये. त्यामुळे नाना पटोलेंना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी माझगाव क्रिकेट क्लबचे नेतृत्व केले आहे. यामध्ये विलासराव देशमुख, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे, पृथ्वीराज चव्हाण अशा दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. 










इतर महत्वाच्या बातम्या


Astronaut Sunita Williams : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकून पडल्या? आतापर्यंत काय काय घडलं अन् परतीचा प्रवास कसा असणार??