मुंबई : महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) अंतिम यादी आज जाहीर करण्य़ात आली. ठाकरे गट 21 जागा, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागा लढवणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या जागेवरून मविआमधून प्रचंड वादंग झाला. जागा वाटपाची यादी जाहीर करण्याची जबाबदारी नाना पटोलेंवर (Nana Patole) होती, मात्र पटोले यांनी यादी जाहीर करण्यास नकार दिल्यानं संजय राऊत (Sanjay Raut) यांनीच यादी जाहीर केली. यावरून चर्चांना उधाण आले.यादी कोण वाचणार हे निश्चित नव्हते. संजय राऊतांनी यादी वाचण्याचा प्रस्ताव वेळेवर दिला, असे म्हणत मीडियाच्या माध्यामातून तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्या तणावाचे मूळ हे संजय राऊत असल्याचे नाना पटोले यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. तसेच सांगली (Sangli), भिवंडीच्या (Bhiwandi) जागा मेरिटवर हव्या होत्या, असे वक्तव्य नाना पटोलींनी माझाशी बोलताना केले आहे
नाना पटोले म्हणाले, संजय राऊत दरवेळी वेळेवर प्रस्ताव देतात दरवेळी संजय राऊत करतात.मीडियाच्या माध्यमातून जी तणवाची निर्मिती कोणी केली त्याचे मूळ कोण आहे हे आता सर्वांना समजले आहे, असे म्हणत नाना पटोलेंनी संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊतच तणावाचे प्रमुख आहे. यादी कोण वाचणार हे ठरलेले नव्हते, असे देखील स्पष्टीकरण नाना पटोलेंनी यावेळी दिले.
सांगली, भिवंडी जागेसाठी सर्वाधिक मी आक्रमक : नाना पटोले
मविआच्या जागावापानंतर सांगली जागेवरुन काँग्रेसमध्ये नाराजी दिसून येतेय. याबाबत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, सांगली, भिवंडी जागा मिळाव्यात यासाठी काँग्रेसने शेवटपर्यंत प्रयत्न केला आहे. एक पाऊल मागे आलो म्हणजे आम्ही मागे आलो असे नाही. सांगली, भिवंडीचा लवकरच मार्ग काढला जाईल. आज लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे यावे त्यापद्धतीचा संदेश आम्ही दिला आहे. सांगली, भिवंडी जागेसाठी सर्वाधिक मी आक्रमक होतो. मी देखील नाराज आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटप हे दिल्लीतील हायकमांडच्या संमतीनेच : नाना पटोले
जागावाटप निश्चित झाल्यानंतर त्यावर चर्चा योग्य नाही. महाविकास आघाडीचे जागावाटप हे दिल्लीतील हायकमांडच्या संमतीनेच झाले आहे. मन मोठं करुन जागावाटप झाले. आता झाले ते झाले आता लढणार आणि जिंकणार. लढू आणि जिंकू अशी आता आमची भूमिका आहे. सांगली भिवंडीसाठी अडून बसणे स्वाभाविक आहे. रडत राहण्यापेक्षा लढणे ही आता आमची भूमिका आहे, असे देखील नाना पटोले म्हणाले.
तोंडचा घास गेला : नाना पटोले
सांगलीची जागा गेल्याने काँग्रेसमधील नाराजी तुम्ही दूर कशी करणार आहे, याविषयी बोलताना नाना पटोले म्हणाले, सांगली, भिवंडी, मुंबईच्या जागा आम्ही आमच्या मेरिटच्या आधारावर हव्या होत्या. हायकमांडच्या आदेशवर सर्व करावे लागते. हे लोकशाही पद्धतीनेच झाले पाहिजे. काँग्रेस 7 जागांवर लढणार आहे. आमच्या परवानगीने उद्या सांगलीत बैठक होणार आहे. जे झाले त्यावर चिंतन करणे गरजेचे नाही.पण तोंडचा घास गेला आहे. सांगलीची जागा मिळेल अशी अपेक्षा होती. वरिष्ठांचे आदेश पाळणे महत्त्वाचे होते. सांगलीच्या जागेसाठी आम्ही सगळे लढलो. वर्षा गायकवाड देखील त्यात सहभागी होत्या.
हे ही वाचा: