Nagpur NMC Elections 2022 : आगामी नागपूर मनपा निवडणुकीसाठी आज महिला आरक्षणाची सोडत मंगळवारी शहरतील सुरेशभट सभागृहात काढण्यात आली. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिलांकरकिता आरक्षित  वार्ड इश्वरचिट्ठीद्वारे जाहीर करण्यात आले. यंदा चार ऐवजी तीन वार्डांचा प्रभाग असल्याने प्रभाग संख्या 38 वरुन 52 वर पोहोचली आहे. तसेच वार्डांच्या सिमेतही बदल करण्यात आल्याने वार्डांची एकूण संख्या 151 वरुन 156 वर पोहोचली आहे. या नवीन सोडतीमुळे माजी महापौर दयाशंकर तिवारी याच्या 23 या प्रभागातून अ वार्डमध्ये सर्वसाधारण महिला आणि ब वार्डातून सर्वसाधारण महिला आरक्षण आले आहे. त्याच प्रकारे माजी नगरसेवक नागेश सहारे, संजय बालपांडे यांच्यासह अनेकांना पक्षाने तिकीट दिल्यास वार्ड बदलून घ्यावे लागेल हे निश्चितच.

नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022
महिला आरक्षण सोडत दि. 31.05.2022
एकूण प्रभाग व संवर्ग एकुण जागा लोकसंख्या
एकुण प्रभाग - 52 एकुण जागा - 156 24,47,494
अनुसूचीत जातीकरीत आरक्षित एकूण - 31 (16 महिला) 4,80,759
अनुसूचीत जमातीकरीता आरक्षित 12 (6 महिला) 1,88,444
सर्वसाधारण एकूण 113 (56 महिला)  


अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांकरिता

या 16 जागांसाठी असलेल्या सोडतीत प्रभाग क्र 2 मधील जागा क्र अ, प्रभाग क्र. 10 मधील जागा क्र. क, प्रभाग क्र. 43 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 13 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र, 20 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 30 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र 27 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र 39 मधील जागा क्र. 16, प्रभाग क्र. 16 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 37 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 45 मधील जाग क्र. अ, प्रभाग क्र. 1 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 14 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 38 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 15 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 52 मधील जाग क्र. अ या 16 जागांचा समावेश आहे.


अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातील आरक्षित जागा

अनुसूचित जामाती महिलांकरिता प्रभाग क्र 24 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 11 मधील जागा क्र.  अ, प्रभाग क्र. 37 मधील जागा क्र. ब, प्रभाग क्र. 12 मधील जागा क्र. ब, प्रभाग क्र. 4 मधील जागा क्र. ब आणि प्रभाग क्र. 51मधील जाग क्र. ब या जागांचा समावेश आहे.


सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित जागा

इश्वर चिठ्ठीद्वारे सोडविण्यात आलेल्या महिला प्रभागांमध्ये प्रभाग 31मधून जागा क्र. ब, प्रभाग 22 मधून जागा क्र. ब, प्रभाग 23 मधून जागा क्र. ब, प्रभाग 40 मधून जागा क्र. ब, प्रभाग 32 मधून जागा क्र. ब, प्रभाग 49 मधून जागा क्र. ब, प्रभाग 29 मधून जाग क्र. ब, प्रभाग 35 मधून जागा क्र. ब, प्रभाग 17 मधून जागा क्र. ब, प्रभाग 17 मधून जागा क्र. ब, प्रभाग 48 मधून जाग क्र. ब, प्रभाग 6 मधून जागा क्र. ब, प्रभाग 2 मधून जागा क्र. ब या जागांचा समावेश आहे.