नागपूर : शिंदे गटातील (Shinde Group) विधानपरिषदेवर (Vidhan Parishad) असलेल्या आमदारांवर अद्याप कोणत्याही कारवाईबाबत विधीमंडळात हालचाली होत नसल्यामुळे ठाकरे गटाकडून (Thackeray Group) न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विधान परिषदेचे सदस्य असलेल्या  विप्लव बजोरिया (Viplav Bajoriya), मनिषा कायंदे (Manish Kayande) आणि निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांच्यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये. त्यामुळे याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय ठाकरे गटाकडून घेण्यात आलाय. 


यामध्ये  उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यावर कारवाई बाबत ठाकरे गटाकडून मागणी होत असल्यामुळे कायदेशी प्रक्रियेबाबत माहिती घेत असल्याचं विधीमंडळाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे निलम गोऱ्हे यांना वगळता इतर दोघांवर जर ठाकरे गटाकडून कारवाई मागणी करण्यात आली तर ही मागणी लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विधीमंडळातील सूत्रांनी दिली. पावसाळी अधिवेशनादरम्यान निलम गोऱ्हे यांच्याबाबत अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशा नोटीस देण्यात आली होती. तरीही  विधीमंडळ काम करण्यात निलम गोऱ्हे यांना अडचण नसल्याबाबत हा निर्णय विधीमंडळाकडून घेण्यात आलाय. 


आमदारांना आपत्र करण्याची मागणी


राज्यात सत्तानाट्याला सुरुवात झाल्यानंतर पावसाळी अधिवेशनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. याच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाकडून विधीमंडळ सचिवांना पत्र लिहिण्यात आलं होतं. या पत्राद्वारे ठाकरे गटाकडून तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली होती. यामध्ये  विप्लव बजोरिया, मनिषा कायंदे आणि निलम गोऱ्हे यांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर या तिन्ही आमदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. 


हिवाळी अधिवेशनात निर्णय


परंतु त्यानंतर या आमदांवर कारवाई करण्यासाठी कोणत्याच हालचाली विधीमंडळाकडून झाल्या नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. त्यामुळे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशानात ठाकरे गटाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय.  आता ठाकरे गट उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याची माहिती समोर येतेय. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बजोरिया यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. या तिन्ही आमदारांनी पक्ष सोडताना पक्ष नेतृत्वावर टीका केली होती.


हेही वाचा :


Shiv Sena MLA Disqualification : ठाकरेंचे वकील कामत यांनी दिलीप लांडे यांना कात्रीत पकडले; उलटतपासणीत अखेर 'तो' प्रश्न आलाच!