Shrivardhan Nagarparishad Election Result 2025: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नगरपरिषद  आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. यामध्ये श्रीवर्धन नगरपालिकेत एक रंजक गोष्ट घडताना दिसली. याठिकाणी ठाकरे गटाचे (Thackeray Camp) नगराध्यक्षपदाचे उमेदवार अतुल चौगुले (Atul Chougule) हे विजयी झाले. मात्र, त्यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर काहीवेळातच ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Nagarparishad Election Result 2025)

Continues below advertisement

अतुल चौगुले विजयी झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे श्रीवर्धनला पोहोचले. त्यांनी याठिकाणी अतुल चौगुले यांचे अभिनंदन केले. त्यानंतर अतुल चौगुले आणि शिंदे गटाच्या अशा दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित जल्लोष केला. भरत गोगावले यांच्या या खेळीमुळे सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आहे. याबाबत भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, अतुल चौगुले हे शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. पण त्यांची मानसिकता शिवसेनेसोबत काम करण्याची आहे. शिवसेनेने त्यांना श्रीवर्धनमध्ये ताकदीने मदत केली. ती मदत ते आयुष्यभर विसरणार नाहीत. आम्ही गनिमी काव्याने युद्ध केले. त्या युद्धात आमचा जय झाला, असे भरत गोगावले यांनी म्हटले.

तर अतुल चौगुले यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भरत गोगावले यांचे जाहीरपणे आभार मानले. माझ्या विजयात भरत गोगावले यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी मला सहकार्य केले. हे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचे यश आहे. श्रीवर्धनमधील लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. या निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. पण श्रीवर्धनच्या जनतेने हे नाकारले. दोन्ही शिवसेना, काँग्रेस, शरद पवार गट, शेकाप आणि अजित पवार गटातील असंतुष्टांनी मला मदत केली. मी या सगळ्यांचा ऋणी आहे, असे अतुल चौगुले यांनी म्हटले. दरम्यान, अतुल चौगुले यांची शिंदे गटाशी ही वाढलेली जवळीक उद्धव ठाकरे यांना कितपत रुचणार, हा प्रश्न आहे. यावर ठाकरे गटातून काही प्रतिक्रिया येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

Continues below advertisement

Nagarpalika Election: श्रीवर्धन नगरपालिका निकाल अपडेट 

नगराध्यक्ष अतुल चौगुले (ठाकरे सेना) 

राष्ट्रवादी काँग्रेस- 15 नगरसेवक भाजप- 2 

शिंदे सेना- 3

आणखी वाचा

Nagaradhyaksha winners list: महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची यादी वाचा एका क्लिकवर

कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!